T20 World Cup 2024: सेमी फायनलमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड आमने-सामने?; आज ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास समीकरण काय?
T20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर अटीतटीच्या लढतीत दोन विकेट राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलंआहे.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup2024) स्पर्धेचं यजमानपद भूषवणाऱ्या वेस्ट इंडिज आणि अमेरिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. तर ग्रुप-2 मधून दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडचा संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. आज दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर अटीतटीच्या लढतीत दोन विकेट राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलं.
आज रात्री भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल. दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या सामन्यानंतर भारताने आज ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध सामना खेळावा लागेल. म्हणजे 27 जूनला होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचा संघ आमनेसामने असतील. त्यामुळे आजच्या या महत्वाच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
INDIA WILL FACE ENGLAND IN THE SEMI FINAL ON 27TH JUNE:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 24, 2024
- If India wins or if it's a washout tonight. pic.twitter.com/JnUxX9jPgs
सामना रद्द झाला तर फायदा कोणाला होणार?
भारताचे सध्या 4 गुण आहेत आणि संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे सध्या प्रत्येकी दोन गुण आहेत. जर भारत-ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल, ज्यामुळे भारताचे 5 गुण आणि ऑस्ट्रेलियाचे 3 गुण होतील. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवावा अशी प्रार्थना करेल, कारण अफगाणिस्तान संघ बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेश मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यूस वेड, पॅट कमिन्स, अश्टन अगर, अॅडम झाम्पा, जॉश हॅजलवूड
मिचेल मार्शने डिवचले-
अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाल्यानंतर मिचेल मार्श म्हणाला की, खेळपट्टी दोन्ही संघांसाठी चांगली नव्हती. हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. आजच्या सामन्यातील विजयाचे संपूर्ण श्रेय अफगाणिस्तान संघाला जाते. या पराभवातून लवकरच बाहेर पडायला आम्हाला आवडेल, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला. तसेच भारतासोबतच्या सामन्याबद्दल तो म्हणाला, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्हाला पुढचा सामना काहीही करुन जिंकायचा आहे आणि त्यासाठी आमच्यासाठी भारतापेक्षा चांगला संघ असू शकत नाही. ज्यांच्या विरोधात आम्हाला विजयाची नोंद करायची आहे, असं म्हणत मिचेल मार्शने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.