एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Ind vs Pak: 'विराट कोहलीच्या जवळ कोणीही नाही...', भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी रोहित शर्मा काय म्हणाला?

T20 World Cup 2024 Ind vs Pak: भारत-पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. 

T20 World Cup 2024 Ind vs Pak Rohit Sharma On Virat Kohli: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे, जो स्पर्धेतील 18 वा सामना असेल. या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. कोहलीने मागील 2022 टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. आता भारत-पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहलीवर (Virat Kohli) कौतुकांचा वर्षाव केला आहे. 

रोहित शर्मा काय म्हणाला? (Rohit Sharma On Virat Kohli)

विराट कोहली बांगलादेशविरुद्ध (सराव सामना) खेळला नाही, पण त्याने पुरेसा सराव केला आहे. त्याने काल सराव केला. आयर्लंविरुद्धचा पहिला सामना चांगला नव्हता. विराट कोहलीला मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, त्याला कोणीही हरवू शकत नाही. त्याच्याप्रमाणेच प्रत्येकावर जबाबदारी असते, असं रोहित शर्माने सांगितले. दरम्यान आयर्लंडविरुद्ध विराट कोहलीने 5 चेंडूत फक्त 1 धाव केली होती. 

विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड-

टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिला सामना आयर्लंड विरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये विराट कोहली काही खास करू शकला नाही. सलामीला कोहली रोहित शर्मासोबत मैदानावर दिसला. मात्र, वेगवान धावा करण्याच्या प्रयत्नात कोहलीने आपली विकेट गमावली. कोहलीने 5 चेंडूत केवळ 01 धावा केल्या होत्या. पण, विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. गेल्या T20 विश्वचषकात, त्याने 53 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 82* धावांची खेळी केली आणि भारताला गमावलेला सामना जिंकण्यास मदत केली.

कोहलीचा आतंरराष्ट्रीय रेकॉर्ड-

कोहलीच्या टी-20 इंटरनॅशनलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकूण रेकॉर्डबद्दल सांगायचे तर, त्याने 10 सामने खेळले आणि 10 डावात 81.33 च्या सरासरीने आणि 123.85 च्या स्ट्राइक रेटने 488 धावा केल्या. या कालावधीत, त्याने आपल्या बॅटने 5 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये उच्च धावसंख्या 82* धावा आहे. कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत 48 चौकार आणि 11 षटकार मारले आहेत.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
×
Embed widget