एक्स्प्लोर

IND Vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव

T20 WC Ind vs NZ: आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सामना होत आहे. या सामन्याविषयी महत्वाचे सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
IND Vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव

Background

IND vs NZ: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) सुपर-12 फेरीत भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज 'करो या मरो'ची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा पत्कारावा लागला होता. त्यामुळे उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाची जबाबदारी केन विल्यमसनच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ गेल्या 18 वर्षांपासून आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध विजयी मिळवू शकला नाही. यामुळे आजचा सामना खूपच अधिक रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. कारण, दोन्ही संघांकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत, जे सामना बदलण्यासाठी सक्षम आहेत. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 चा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.00 वाजता नाणेफेक होईल. यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 7.30 वाजता या सामन्याला सुरवात होईल. भारत-न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी चॅनेलवर केले जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स वन एचडी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय, डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. याशिवाय, www.abplive.com वर या सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स मिळवता येणार आहेत. 

संघ- 
भारतीय संभाव्य संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वरुण सीव्ही, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड संभाव्य इलेव्हन: मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन (कर्णधार), जेम्स नीशम, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (विकेटकीपर), मिचेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट

T20 WC Ind vs NZ: न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची अग्निपरीक्षा, भारताला आज जिंकणं आवश्यक अन्यथा रस्ता खडतर
IND vs NZ : T20 विश्वचषकात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्ताननं भारत आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. पाकिस्ताननं न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयानं भारतासाठी एक संधी निर्माण झाली आहे. सुपर 12 फेरीच्या दुसऱ्या गटात आज न्यूझीलंडशी टीम इंडियाचा सामना होणार आहे. टीम इंडियानं जर का हा सामना जिंकला तर सेमीफायनलसाठीचा भारताचा मार्ग सुकर होणार आहे, जर या सामन्यात पराभव झाला तर मात्र भारताचा रस्ता खडतर होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता हा सामना दुबईत होणार आहे.

IND vs NZ: भारतासमोर  ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीचे आव्हान? विराट कोहली म्हणाला...
टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने आक्रमक गोलंदाजी केली. पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीनआफ्रिदीने सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचे सलामीवर रोहित शर्मा आणि केएल राहुलला बाद करून संघाला दबावात टाकले. परिणामी, भारतीय संघाला चांगल्या धावा करत्या आल्या नाहीत. ज्यामुळे भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. भारताचा पुढील सामना न्यूझीलंडसोबत (India Vs New Zealand) होणार आहे. न्यूझीलंडचा डावखुरा गोलंदाज ट्रेन्ट बोल्टच्या (Trent Boult) गोलंदाजीसमोर भारताला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. यावर भारताचा कर्णधावर विराट कोहलीने  (Virat Kohli) प्रतिक्रिया दिली आहे. 

23:55 PM (IST)  •  31 Oct 2021

न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव

न्यूझीलंड विरुद्ध 'करो या मरो'च्या सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव झाला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. भारताने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 110 धावा केल्या. या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने 8 विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला आहे. या पराभवासह भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याचा आशा धूसर झाल्या आहेत. 

21:09 PM (IST)  •  31 Oct 2021

IND vs NZ, T20 World Cup: भारताचे न्यूझीलंडसमोर 111 धावांचे लक्ष्य

टी-20 विश्वचषकातील 28 व्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. दरम्यान, भारताला 20 षटकात विकेट्स गमावून केवळ 110 धावापर्यंत मजल मारता आली आहे. 

20:43 PM (IST)  •  31 Oct 2021

रिषभ पंतची निराशाजनक कामगिरी, भारताला पाचवा झटका

न्यूझीलंडविरुद्ध भारताला पाचवा झटका लागला आहे. भारताचा विकेटकिपर रिषभ पंतला मोठी धावसंख्या करता आल्या नाहीत. त्याने 19 बॉलचा सामना करीत केवळ 12 धावा केल्या आहेत. भारताची धावसंख्या- 70/5 (14.3) 

20:25 PM (IST)  •  31 Oct 2021

IND vs NZ, T20 World Cup: भारतीय संघाला चौथा झटका, विराट कोहली 9 धावा करत बाद

न्यूझीलंड विरुद्ध करो या मरोच्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ईश सोडीच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहली बाद झाला आहे. विराटने 17 बॉलवर 9 धावा केल्या. भारताची धावसंख्या- 52/4 (11)

20:10 PM (IST)  •  31 Oct 2021

IND vs NZ, T20 World Cup: भारताचा तिसरा विकेट्स, रोहित शर्मा मोठी धावसंख्या करण्यास अपयशी

न्यूझीलंड संघाविरोधात भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. सलामीवीर ईशान किशन, केएल राहुल यांच्या पाठोपाठ रोहित शर्मानेही त्याची विकेट्स गमावली आहे. भारताची धावसंख्या-  41/3 (8)  

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget