एक्स्प्लोर

T-20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपसाठी माजी खेळाडूनं निवडली टीम इंडियाची ड्रीम टीम , रिंकू सिंगला डच्चू

T-20 World Cup: जून महिन्यात सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ यानं त्याच्या मनातली ड्रीम टीम सांगितली आहे.

नवी दिल्ली: आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला रवाना होईल. भारताची वर्ल्ड कपमधील पहिली मॅच आयरलँडसोबत होईल. भारतानं 2007 च्या पहिल्या टी- 20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये देखील भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. वर्ल्ड कपला आता 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं त्याच्या मनातील टीम इंडिया निवडली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये टी-20 मधील भारताचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंग, संजू सॅमसन यांना संधी देण्यात आलेली नाही. 

मोहम्मद कैफनं कुणावर विश्वास ठेवला?

मोहम्मद कैफनं आयपीएलमध्ये आतापर्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालवर विश्वास ठेवला आहे. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा भारताच्या डावाची सुरुवात करतील, असं त्यानं म्हटलं. याशिवाय रिषभ पंतला त्यानं विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून संधी दिली आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या असा भारताच्या बॅटिंगचा क्रम असू शकतो. त्यानंतर सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल आणि 8 व्या क्रमांकावर रवींद्र जडेजाला बॅटिंगला पाठवावं, असं कैफ म्हणाला. धक्कादायक बाब म्हणजे टी-20 मधील भारताचा युवा खेळाडू रिंकू सिंग, शुभमन गिल आणि संजू सॅमसनला मोहम्मद कैफनं संघात स्थान दिलेलं नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये तीन अर्धशतक झळकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या रियान परागला कैफनं प्राधान्य दिलं आहे. 

मोहम्म्द कैफनं पुढं स्पिनर कुलदीप यादवला देखील संघात स्थान दिलं आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह हे भारताचे वेगवान गोलंदाज असतील. याशिवाय युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजला देखील संधी दिली जावी, असं कैफनं म्हटलंय.  

कैफनं निवडलेल्या ड्रीम टीममध्ये कुणाला संधी?

यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, शिवम दुबे, रियान पराग आणि मोहम्मद सिराज

भारत टी-20 वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरणार?

भारतानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला होता. भारतानं पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत विजय मिळवला होता. मात्र, 2007 नंतर भारताला पुन्हा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरता आलेलं नाही.  भारत यंदा तरी दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरणार का ते पाहावं लागणार आहे. 

संबंधित बातम्या : 

IPL 2024, MI vs CSK :ऋतुराज हार्दिक आमने सामने, मुंबई आणि चेन्नईच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी?

Rohit Sharma : ना दिल्ली, ना लखनौ आता चेन्नईची चर्चा, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? नवा दावा नेमका कुणी केला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget