Ruturaj Gaikwad: वनडेत नाही मिळाली संधी, त्यानंतर पोहचला मोहालीत; सर्विसेजविरुद्ध अवघ्या 59 चेंडूत ठोकलं शतक!
Syed Mushtaq Ali Trophy 2022: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 चा 24वा सामना महाराष्ट्र आणि सर्व्हिसेस म्हणजेच सेना दल यांच्यात आज (12 ऑक्टोबर) मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जातोय.
Syed Mushtaq Ali Trophy 2022: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 चा 24वा सामना महाराष्ट्र आणि सर्व्हिसेस म्हणजेच सेना दल (Maharashtra vs Sevices) यांच्यात आज (12 ऑक्टोबर) मोहाली (Mohali) येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Punjab Cricket Association Stadium) खेळला जातोय. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) दमदार शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात (India vs South Africa 1st ODI) फ्लॉप ठरलेल्या ऋतुराज गायकवाड अखरेच्या दोन सामन्यातून वगळण्यात आलं. परंतु, देशातंर्गत क्रिकेट सामन्यात ऋतुराजचा रौद्रवतार पाहायला मिळाला.
सर्व्हिसेसविरुद्ध सामन्यता ऋतुराज गायकवाडनं अवघ्या 59 चेंडूत झळकावलं. मात्र, शतक पूर्ण केल्यानंतर अखेरच्या षटकात तो मोहित कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. या सामन्यात ऋतुराजनं 65 चेंडूंचा सामना करत 172.31 च्या स्ट्राईक रेटनं 112 धावा केल्या. ज्यामध्ये 12 चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.
ट्वीट-
Ruturaj Gaikwad traveled from Delhi to Punjab after the 3rd ODI last night and then today he scored 112 runs from 65 balls including 12 fours and 5 sixes in SMAT 2022.
— Johns. (@CricCrazyJohns) October 12, 2022
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळलं
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रुतुराज गायकवाड भारतीय संघाचा भाग होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली होती. मात्र, या सामन्यात त्यानं संथ खेळी केली. त्यानं 42 चेंडूत अवघ्या 19 धावांची खेळी केली. त्यानंतर उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यातून त्याला वगळण्यात आलं.
मुश्ताक अली ट्रॉफीत चमकदार कामगिरी
मुश्ताक अली ट्रॉफीत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाडनं त्याचा ऋद्रवतार दाखवला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्ली येथे 11 आक्टोबर रोजी तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यानंतर 12 ऑक्टोबरला सर्विसेसविरुद्ध सामना खेळण्यासाठी ऋतुराज गायकवाड मोहालीत दाखल झाला होता.
हे देखील वाचा-