(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022: आजपासून सुपर-12 फेरीला सुरुवात, पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया आमनेसामने
टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीला आजपासून सुरुवात होत आहे. या फेरीची सुरुवात शेवटच्या टी-20 विश्वचषकातील अंतिम फेरीतील संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (New Zealand vs Australia) यांच्यातील सामन्यानं होईल.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीला आजपासून सुरुवात होत आहे. या फेरीची सुरुवात शेवटच्या टी-20 विश्वचषकातील अंतिम फेरीतील संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (New Zealand vs Australia) यांच्यातील सामन्यानं होईल. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) या दोन्ही संघातील क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 12.30 वा. सुरू होईल. मात्र, या सामन्यावर पावसाची सावली आहे. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता 90 टक्के आहे.
महत्वाचं म्हणजे, टी-20 विश्वचषकाची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून झालीय, ज्यात पात्रता फेरीतील सामने खेळवले गेले. ज्यात आठ संघामध्ये 12 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर चार संघांनी सुपर-12 मध्ये प्रवेश केला. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांसारख्या 8 संघानं आधीच सुपर-12 मध्ये उपस्थित आहेत. सुपर-12 चे सर्व संघ दोन गटात विभागले गेले आहेत. प्रत्येक गटात 6-6 संघ आहेत. या फेरीत एकूण 30 सामने खेळवले जाणार आहेत.
टी-20 विश्वचषकाची सुरुवात गोड करण्याचा दोन्हा संघाचा प्रयत्न
पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियासमोर न्यूझीलंडचे आव्हान असेल. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियापेक्षा एक स्थान वर आहे. न्यूझीलंड पाचव्या, तर ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियानं नुकतीच भारत आणि इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका गमावली आहे. सराव सामन्यातही ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडं या महिन्यात खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडच्या संघालाही पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. तर, सराव सामन्यातही त्यांचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. अशा स्थितीत नुकताच झालेला पराभव विसरून विश्वचषक मोहिमेची ताकदीनं सुरुवात करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.
संभाव्य संघ-
ऑस्ट्रेलिया:
आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोस हेझलवुड.
न्यूझीलंड:
डेव्हन कॉनवे, फिन ऍलन/मार्टिन गप्टिल, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन/अॅडम मिल्ने, ईश सोढी.
हे देखील वाचा-