(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Team India Schedule : सुपर 12 चे संघ जाहीर, नेदरलँड, झिम्बाब्वे भारताच्या गटात, वाचा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक
T20 World Cup : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील ग्रुप स्टेजच्या सामन्यानंतर भारतीय संघ असणाऱ्या ग्रुपमध्ये नेदरलँडसह झिम्बाब्वेचा संघ पोहोचला आहे.
Team India in T20 World Cup : भारतीय संघ (Team India) टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सामन्यांसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. सराव सामनेही झाले असून आता थेट 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) महामुकाबल्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान भारत असणाऱ्या ग्रुपमध्ये आता झिम्बाब्वे आणि नेदरलँड या संघानी जागा मिळवली आहे. ज्यानंतर भारताचे विश्वचषकातील सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. तर नेमका भारताचा सामना कधी कोणासोबत आहे पाहूया...
सामना | दिवस | वेळ |
भारत विरुद्ध पाकिस्तान | 23 ऑक्टोबर | दुपारी 1.30 वाजता |
भारत विरुद्ध नेदरलँड | 27 ऑक्टोबर | दुपारी 12.30 वाजता |
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका | 30 ऑक्टोबर | दुपारी 4.30 वाजता |
भारत विरुद्ध बांग्लादेश | 2 नोव्हेंबर | दुपारी 1.30 वाजता |
भारत विरुद्ध झिम्बाब्वे | 6 नोव्हेंबर | दुपारी 1.30 वाजता |
विश्वचषक संघात बुमराहच्या जागी शमीची एन्ट्री
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्वचषक अगदी तोंडावर असताना दुखापत झाली. त्यामुळे भारतात बुमराहच्या जागी कोण खेळणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता. ज्यानंतर नुकतीच टीम इंडियाने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बुमराहच्या जागी संघात एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता बुमराहच्या जागी शमी आल्यानंतर T20 विश्वचषकासाठी भारताचे अंतिम 15 खेळाडूंची यादी समोर आली आहे.
असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
हे देखील वाचा-