Team India for Sri Lanka tour : श्रीलंकेविरुद्ध सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिककडे टी20 संघाचं कर्णधारपद, तर वन-डेमध्ये रोहितचं कॅप्टन
IND vs SL : बांगलादेश दौऱ्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका संघ यांच्यात सामने रंगणार असून नुकताच बीसीसीआयने यासाठी संघ जाहीर केला आहे.
Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) 2023 वर्षांची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) नुकताच संघ जाहीर केला आहे. यावेळी टी20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे दिलं गेलं असून एकदिवसीय संघाची धुरा रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडेच आहे.
विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला टी20 संघाचा उपकर्णदार केलं असून बऱ्याच युवा खेळाडूंना टी20 संघात संधी दिली गेली आहे. याशिवाय रोहितसह विराट,श्रेयस अय्यर, केएल राहुल हे दिग्गज टी20 संघात नसून एकदिवसीय संघात आहेत. तर ऋषभ पंत हा दोन्ही संघात नसल्याचं दिसून येत आहे. तर नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया...
भारताचा टी20 संघ-
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
#TeamIndia squad for three-match T20I series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/iXNqsMkL0Q
— BCCI (@BCCI) December 27, 2022
भारताचा एकदिवसीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह
#TeamIndia squad for three-match ODI series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/XlilZYQWX2
— BCCI (@BCCI) December 27, 2022
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला एकदिवसीय सामना | 3 जानेवारी | वानखेडे स्टेडियम, मुंबई | सायंकाळी 7 वाजता |
दुसरा एकदिवसीय सामना | 5 जानेवारी | एमसीए स्टेडियम, पुणे | सायंकाळी 7 वाजता |
तिसरा एकदिवसीय सामना | 7 जानेवारी | सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट | सायंकाळी 7 वाजता |
टी20 मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला टी20 सामना | 10 जानेवारी | बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी | दुपारी 2 वाजता |
दुसरा टी20 सामना | 12 जानेवारी | ईडन गार्डन्स, कोलकाता | दुपारी 2 वाजता |
तिसरा टी20 सामना | 15 जानेवारी |
ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम |
दुपारी 2 वाजता |
हे देखील वाचा-