एक्स्प्लोर

IPL 2023: बेन स्टोक्स की ऋतुराज गायकवाड कोण होणार धोनीचा उत्तराधिकारी? कोणाला मिळणार चेन्नईचं कर्णधारपद?

MS Dhoni Captaincy : महेंद्रसिंह धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जची कमान कोणाकडे सोपवली जाईल? हा प्रश्न समोर असतान बेन स्टोक्स आणि ऋतुराज गायकवाड या दोघांची नावं चर्चेत आहेत.

IPL 2023, Chennai Super Kings : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे. दरम्यान लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला (Ben stokes) तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले. दरम्यान स्टोक्स संघात आल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जची कमान गायकवाडकडे सोपवली जाणार की स्टोक्सकडे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या चर्चेदरम्यान, सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

स्टोक्स की गायकवाड कोणाकडे सीएसकेची धुरा?

चेन्नई सुपर किंग्जच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला सांगितले की, 'आम्ही स्टोक्सला खरेदी केल्यामुळे खूप आनंदी आहोत. तो सामना जिंकवणारा खेळाडू आणि एक उत्तम कर्णधार आहे. मात्र, महेंद्रसिंग धोनीनंतर सीएसकेचा कर्णधार स्टोक्स होणार का हे ठरवणं अजून बाकी आहे. परदेशी खेळाडू संघाचा कर्णधार झाला तर टीम कॉम्बिनेशनमध्ये अडचण येते. पुढच्या हंगामात स्टोक्सची साथ मिळाली नाही तर अडचण येईल. त्यामुळे ऋतुराज गायकवाड कर्णधार बनवण्याच्या शर्यतीत कायम आहे.

कॅप्टनच्या शर्यतीत गायकवाड पुढे

चेन्नई सुपर किंग्जचा आगामी कर्णधारपदाच्या शर्यतीत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आघाडीवर आहे. याचे कारण तो एक भारतीय खेळाडू आहे आणि त्यामुळे तो कॅप्टन असताना संघाच्या कॉम्बिनेशनमध्ये फारशी अडचण येणार नाही. दुसरीकडे, गायकवाड याला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे, तो डॉमेस्टीक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार असून महाराष्ट्र संघाची कामगिरीही चांगली असल्याचं दिसून आलं आहे. कर्णधार असताना त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली असल्याने त्याला कर्णधारपदाचा एक तगडा उमेदवार मानलं जात आहे.

चेन्नईच्या संघानं विकत घेतलेले खेळाडू
बेन स्टोक्स (16.25 कोटी), भगत वर्मा (20 लाख), अजय जादव मंडल (20 लाख), कायल जेमिसन (एक कोटी), निशांत सिंधू (60 लाख), शेख रशीद (20 लाख), अजिंक्य रहाणे (50 लाख).

चेन्नईचा संपूर्ण संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉन्वे, मोईन अली, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महिश तिक्ष्णा, प्रशांत सोलंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगेरगेकर, मिचेल सँटनर, मथिशा पाथिराना, सुभ्रांशु सेनापती,  तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, भगत वर्मा, अजय जाधव मंडल, काईल जेमिसन, निशांत सिंधू, शेख रशीद आणि अजिंक्य रहाणे.

चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, मोईन अली, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, समरजीत सिंह, महिश तिक्ष्णा, मुकेश चौधरी.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK Playing XI IPL 2026 : संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
Indian Premier League 2026 : आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' चार दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Embed widget