SL vs AUS 1st ODI : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच मोठा अपसेट! ऑस्ट्रेलियाची टीम ढेपाळली, श्रीलंकेविरुद्ध लाजीरवाणा पराभव
Sri Lanka vs Australia : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत सर्व संघ व्यस्त आहेत, पण त्याआधी मोठा अपसेट पाहिला मिळाला.

Sri Lanka vs Australia 1st ODI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत सर्व संघ व्यस्त आहेत, पण त्याआधी मोठा अपसेट पाहिला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र न ठरलेल्या श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला हरवून मोठा अपसेट निर्माण केला. खरंतर, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला फक्त 214 धावांचा पाठलाग करायचा होता, पण कांगारू संघ ते करू शकला नाही आणि 49 धावांनी सामना गमावला.
ऑस्ट्रेलिया हरला!
कोलंबो येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध फक्त 215 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, परंतु तरीही संघाने तो सामना 49 धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियन संघ फक्त 33.5 षटकांत ऑलआऊट झाला. या संघाने 165 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची कारण श्रीलंकेचा कर्णधार चारिथ अस्लंका आणि महेश थीकशना आहे. आधी अस्लंकाने 127 धावा केल्या तर थीकशनाने 4 विकेट्स घेतल्या.
Charith Asalanka's fightback inspires Sri Lanka to a win in Colombo 👏#SLvAUS 📝: https://t.co/5yPD8pHYzk pic.twitter.com/9eAJNIPROV
— ICC (@ICC) February 12, 2025
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण श्रीलंकेचा हा निर्णय त्यांच्या बाजूने ठरला नाही. एके वेळी संघाने 55 धावांच्या धावसंख्येत 5 विकेट गमावल्या होत्या. पथुम निस्सांका (4), अविष्का फर्नांडो (4), कुसल मेंडिस (19), कामिंदू मेंडिस (5), झेनिथ लियानागे (11) हे सर्वजण स्वस्तात बाद झाले.
श्रीलंकेचा डाव 214 धावांवर संपला!
यानंतर, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका याने कर्णधारपदाची खेळी खेळताना शतक झळकावले. अस्लंकाने 126 चेंडूत 14 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 127 धावा केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील चौथे शतक होते. त्याच्याशिवाय, ड्युनिथ वेल्सने 34 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावा केल्या, तो संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब...
यानंतर, जेव्हा ऑस्ट्रेलियाचा डाव आला तेव्हा संघाचे दोन्ही सलामीवीर, म्हणजेच मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क यांनी 7 वांच्या आत आपले विकेट गमावले. शॉर्ट 0 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि मॅकगर्क 2 धावा काढून आऊट झाला. यानंतर, ऑस्ट्रेलियाचा कूपर कॉनोली 3 धावा काढून बाद झाला, कर्णधार स्टीव्ह स्टिम 12 धावा आणि लाबुशेन 15 धावा काढून आऊट झाले.
महेश थीक्षानाने घेतल्या 4 विकेट्स...
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीने केल्या. त्याने 38 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 41 धावा केल्या. याशिवाय, आरोन हार्डीने 32, शॉन अॅबॉटने 20, नॅथन एलिसने 0, अॅडम झम्पाने 20 आणि स्पेन्सर जॉन्सनने 0 धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश थीक्षानाने 4, असिता फर्नांडो आणि डुनिथ वेलेझ यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वानिंदू हसरंगा आणि चरिथ असलंका यांनीही 1-1 विकेट घेतल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रीलंकेने दिला मोठा धक्का
श्रीलंकेचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग नाही. ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग आहे आणि तो विश्वविजेता देखील आहे. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून श्रीलंकेने मोठा अपसेट निर्माण केला आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
