एक्स्प्लोर

Year Ender 2022 : 'या' 11 क्रिकेटपटूंचा 2022 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश

Cricket News : या वर्षी इऑन मॉर्गनसारखा विश्वचषक विजेता कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याच्याशिवाय इतरही अनेक दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

Retired Cricketers List 2022 : 2022 हे वर्ष आता संपत आलं असून अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षातही अनेक क्रिकेटपटूंनी (Retired Cricketers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. या काळात काही जणांनी निवृत्तीचे वय गाठले होते तर काहीनी अचानक क्रिकेटला अलविदा केला. काही क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या निर्णयाने तर संपूर्ण क्रिकेट जगतासह चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. तर या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे यापूर्वी विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य देखील होते. या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या काही मोठ्या क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊया...

तर या क्रिकेटर्समधील एक मोठं नाव म्हणजे इयॉन मॉर्गन... इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गनच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विश्वचषक जिंकल्यानंतर पुढील विश्वचषकापूर्वी निवृत्ती जाहीर करणारा तो जगातील पहिला कर्णधार आहे. विश्वचषकानंतर त्याला एकही मोठी खेळी खेळता आली नव्हती हे देखील तितकेच खरं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला.

या दिग्गजांनी देखील घेतली निवृत्ती

वेस्ट इंडिजचा मर्यादित षटकांचा कर्णधार कायरन पोलार्डनेही क्रिकेटला अलविदा केला. एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रमही पोलार्डच्या नावावर आहे. त्यांच्याशिवाय विंडीज संघाचे दिनेश रामदिन आणि लेंडल सिमन्स, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस, श्रीलंकेचा सुरंगा लकमल, न्यूझीलंडचा हमिस बेनेट, भारताचा रॉबिन उथप्पा यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या सर्व क्रिकेटपटूंशिवाय इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून आणि श्रीलंकेचा गुणथिलका याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

View this post on Instagram
 
A post shared by Kieron Pollard (@kieron.pollard55)

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024Mumbai Lok Sabha Elections : मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये मतदान, कोणकोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाPraful Patel on Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या दाव्यांबद्दल पटेलांचं उत्तर, म्हणाले होय मी...CM Eknath Shinde Thane : तयारी संपली, उद्या परिक्षेची वेळ, मुख्यमंत्री शिंदे दिघेंच्या स्मृतीस्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
Embed widget