Steve Smith: स्टीव्ह स्मिथ फॉर्ममध्ये परतला! दीड वर्षानंतर शतक झळकावून विराटचा खास विक्रम मोडला
SL vs AUS 2nd Test: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (Sri Lanka vs Australia) यांच्यात गॅले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Galle International Stadium) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.
SL vs AUS 2nd Test: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (Sri Lanka vs Australia) यांच्यात गॅले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Galle International Stadium) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसाअखेर पाच विकेट्स गमावून 298 धावा केल्या आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनं (Steve Smith) नाबाद 109 धावांची खेळी केलीय. गेल्या दीड वर्षानंतर स्टीव्ह स्मिथनं शतक झळकावलंय. या शतकासह स्टीव्ह स्मिथनं भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडलाय.
विराटचा कोणता विक्रम मोडला?
दरम्यान, स्टीव्ह स्मिथ जवळपास दीड वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्म होता. या कालावधीतील 16 डावात त्याला एकही शतक झळकावता आलं नव्हतं. परंतु, श्रीलंकाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं शतकांचा दुष्काळ संपवला. स्टीव्ह स्मिथच्या कसोटी कारकिर्दीतील हे 28 वं शतक आहे. या शतकासह स्टीव्ह स्मिथनं विराट कोहलीला मागं टाकत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट, हाशिम अमला आणि मायकल क्लार्क यांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. विराट कोहलीनं त्याच्या कसोटी कारकिर्दीत 27 शतक झळकावली आहेत.
ट्वीट-
स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेनं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला
श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियानं 70 धावांत दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथनं तिसऱ्या विकेट्ससाठी 134 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. लाबुशेनंही दमदार फलंदाजी करत संघासाठी 104 धावांचं योगदान दिलं. ज्यात 12 चौकारांचा समावेश आहे. लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची धावासंख्या 298 वर पोहचली आहे.
हे देखील वाचा-
- ENG vs IND, 2nd T20, Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी20 मध्ये पावसाचा व्यत्यय? कशी असेल हवामानाची स्थिती?
- Malaysia Masters 2022 : एच.एस प्रणॉयची दमदार कामगिरी, उपांत्य फेरीत धडक
- India vs West Indies 2022 : वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेत कोहली, शर्मा, पंत मैदानात उतरणार, समोर आली मोठी माहिती