एक्स्प्लोर

Malaysia Masters 2022 : एच.एस प्रणॉयची दमदार कामगिरी, उपांत्य फेरीत धडक

HS Pranoy : एकीकडे पीव्ही सिंधू पराभूत झाली असली तरी प्रणॉयने मात्र जपानच्या कांता त्सुनेयामा याला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे.

Malaysia Open 2022 : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय (HS Pranoy) याने मलेशिया ओपनच्या (Malaysia Open 2022) उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या कांता त्सुनेयामा (Kanta Tsuneyama) याला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. एकीकडे पीव्ही सिंधूला चीनच्या ताय त्झू यिंगने (Tai Tzu Ying) पराभूत केल्यामुळे तिचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी प्रणॉय मात्र अजूनही स्पर्धेत असल्याने भारताला किमान पुरुष गटात विजयाची अपेक्षा आहे.

29 वर्षीय प्रणॉयने सुरुवातीपासून खेळावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. त्याने सरळ दोन सेट्समध्ये हा विजय मिळवला. यावेळी प्रणॉयने पहिल्या सेटमध्ये 25-23 च्या फरकाने विजय मिळवला. तर दुसऱ्या सेटमध्ये 22-20 च्या फरकाने प्रणॉयने सेट जिंकत सामना आपल्या नावे केला. प्रणॉय या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचलेला एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.

सिंधू मात्र पराभूत

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) ही मात्र याच स्पर्धेत अर्थात मलेशिया ओपनच्या महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली आहे. चीनच्या ताय त्झू यिंगने (Tai Tzu Ying) सिंधूला पराभूत करत स्पर्धेबाहेर केल्यामुळे तिचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. 55 मिनिटं चाललेल्या या सामन्यात सिंधू 13-21, 21-12, 12-21 च्या फरकाने पराभूत झाली. उपांत्य पूर्व फेरीच्या या महत्तपूर्ण सामन्यात पहिल्या सेटमध्ये यिंगने दमदार खेळ दाखवला. आधीपासून चांगले पॉईंट्स जमवत ती थेट 13-21 अशा मोठ्या फरकाने जिंकली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने पुनरागमन केलं आणि 21-12 च्या फरकाने सिंधूने सेट जिंकला. ज्यानंतर अखेरचा आणि निर्णायक सेट कोण जिंकेल? याकडे सर्वांचे लक्ष्य होते. पण हा सेट 21-14 च्या फरकाने यिंगने जिंकत सामनाही नावे केला.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget