IND vs ENG : शुभमन गिलचा अप्रतिम झेल, बेन डकेट स्वस्तात तंबूत, झेल पाहून तुम्हीही कराल कौतुक
Shubman Gill Catch : धर्मशाला कसोटी सामन्यात युवा शुभमन गिल यानं शानदार फिल्डिंग केली. शुभमन गिल यानं घेतलेल्या झेलचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
Shubman Gill Catch : धर्मशाला कसोटी सामन्यात युवा शुभमन गिल यानं शानदार फिल्डिंग केली. शुभमन गिल यानं घेतलेल्या झेलचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. शुभमन गिल यानं अप्रतिम झेल घेत इंग्लंडच्या डावाला सुरुंग लागला. 18 व्या षटकांपर्यंत भारताला विकेट मिळत नव्हती, बुमराह अन् सिराज यांनी खूप प्रयत्न केले. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी केली. पण कुलदीपच्या चेंडूवर अखेर शुभमन गिल यानं बेन डकेट याचा अप्रतिम झेल घेतला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिला धक्का 18 व्या षटकात बसला. कुलदीप यादवच्या चेंडूवर बेन डेकेट तंबूत परतला. कुलदीपचा चेंडूवर मोठा फटका मारण्याचा बेन डकेट यानं प्रयत्न केला. पण चेंडू हवेत उडाला... सर्कलमध्ये फिल्डिंग करणाऱ्या शुभमन गिल यानं धाव घेत बेन डकेट याचा अप्रतिम झेल घेतला. बेन डकेट याची खेळी संपुष्टात आणली. बेन डकेट यानं 58 चेंडूत 27 धावांची खेळी केली. बेन डकेट यानं जॅक क्रॉलीसोबत इंग्लंडला संयमी सुरुवात करुन दिली होती. पण कुलदीपनं इंग्लंडच्या डावाला सुरुंग लावला. शुभमन गिल यानं घेतलेला अप्रतिम झेलचा व्हिडीओ बीसीसीआयनं सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
बेन डकेट याचा झेल घेण्यासाठी शुभमन गिल याला उलटं धावावं लागलं. त्यानं सर्कलबाहेर धावत जात डकेट याचा झेल घेतला. त्यामुळे ही विकेट शुभमन गिल याच्या नावावर जायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली.
पाहा व्हिडीओ -
SHUBMAN GILL, TAKE A BOW.
— Johns. (@CricCrazyJohns) March 7, 2024
- Gill is one of the best fielders in World cricket. 🇮🇳pic.twitter.com/bEaIeDMFjN
फिरकीच्या जाळ्यात साहेब अडकले -
भारताच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचा संघ अडकलाय. चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. इंग्लंडचे आठ फलंदाज 184 धावांत तंबूत परतले आहेत. भारताकडून कुलदीप यादवने पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. तर आर. अश्विन यानं दोन विकेट घेतल्या तर जाडेजानं एका फलंदाजाला तंबूत पाठवलं. इंग्लंडकडून जॅक क्रॉली यानं संघर्ष केला. त्यानं 108 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी केली. त्याशिवाय बेन डकेट 27, ओली पॉप 11, जो रुट 26, जॉनी बेअरस्टो 29 , बेन स्टोक्स आणि टॉप हार्ट्ले यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.
कुलदीप यादवने 15 षटकात 72 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. तर रवींद्र जाडेजानं सात षटकात 14 धावा खर्च करत एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनीही भेदक मारा केला. त्यांना विकेट मिळवण्यात अद्याप अपयश आलेय.