Suryakumar Yadav : रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवचा नंबर लागणार? अजित आगरकरच्या एका वक्तव्यावरुन तर्क वितर्क
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. वनडे टीमचं नेतृत्त्व शुभमन गिल तर टी 20 टीमचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करणार आहे.

मुंबई: भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारत या दौऱ्यावर 3 वनडे आणि 5 टी 20 सामने होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वनडे आणि टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. भारताच्या वनडे टीमचा कॅप्टन शुभमन गिल तर टी 20 चा कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे. मात्र, रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलची निवड केल्यानंतर येत्या काळात सूर्यकुमार यादवच्या जागी कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड टी 20 मध्ये होऊ शकते, अशा चर्चा रंगल्या आहेत.
Ajit Agarkar Statement : अजित आगरकरचं ते वक्तव्य चर्चेत
बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीची घोषणा केल्यानंतर मोठं वक्तव्य केलं आहे. अजित आगरकर म्हणाले की तीन फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कॅप्टन ठेवणं अवघड आहे. तीन फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असल्यास रणनीती ठरवण्यात अडचणी निर्माण होतात.
रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवचा नंबर?
रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलकडे संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं होतं. भारताच्या वनडे संघाचं नेतृत्त्व आता शुभमन गिलकडे देखील देण्यात आलं आहे. अजित आगरकरच्या एका वक्तव्यामुळं तीन फॉरमॅटमध्ये एकचं कर्णधार असू शकतो अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. कसोटी, वनडे नंतर शुभमन गिलकडेच टी 20 संघाचं कर्णधारपद दिलं जाणार का अशा चर्चा सुरु आहेत.
बीसीसीआयकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूर्युकमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं आशिया कप जिंकला आहे. त्यामुळं भारताच्या टी 20 संघाचा कर्णधार बदलण्याची घाई बीसीसीआय करेल अशा शक्यता कमी आहेत. आगामी टी 20 वर्ल्डकपच्या निमित्तानं कर्णधार सूर्यकुमार यादवकडेच राहण्याची शक्यता आहे.
वनडेसाठी भारताचा संघ
शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
वनडे मालिकेचं वेळापत्रक
19 ऑक्टोबर - पहिली वनडे (पर्थ)
23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)
25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)




















