शुभमन गिलचा मोठा विक्रम, सचिन-कोहलीसह बाबरला टाकले मागे
Shubhman Gill Century : भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याने इंदौरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
Shubhman Gill Century : भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याने इंदौरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुभमन गिल याने दुसऱ्या वनडे सामन्यात झंझावती शतक ठोकले. या शतकी खेळीसह गिलने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याशिवाय सचिन तेंडुलकर, हाशिम अमला, विराट कोहली आणि बाबर आझम या सारख्या दिग्गज फलदाजांचा विक्रम मोडलाय. इंदौर वनडे सामन्यात गिलने ९७ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि चार षटकार ठोकले. शुभमन गिल याचे सहावे वनडे शतक तर ऑस्ट्रेलियाविरोधात पहिले शतक होय.
वनडे सामन्याच्या 35 डावात सर्वाधिक धावा गिलच्या नावावर
वनडे क्रिकेटच्या इतिहासात 35 डावात शुभमन गिल याने 1900 धावांचा पाऊस पाडलाय. असा पराक्रम करणारा शुभमन गिल पहिलाच फलंदाज आहे. पहिल्या ३५ डावात सर्वाधिक धावा गिलच्या नावावर झाल्या आहेत. त्याने दक्षिण अफ्रिकेचा हाशिम आमला, पाकिस्तानचा बाबर आझम, फखर जमान आणि विराट कोहली, सचिन तेंडुलकर या सर्वांना मागे टाकलेय.
वनडेच्या 35 डावात सर्वाधिक धावा
शुभमन गिल- 1917 धावा
हाशिम आमला- 1844 धावा
बाबर आझम- 1758 धावा
रासी वान डर डुसेन- 1679 धावा
फखर जमान- 1642 धावा
Shubman Gill became the first batter to score 1900 runs after 35 innings in ODI history.
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2023
- Gill is breaking record books. pic.twitter.com/yf1kci1P3P
शुभमन गिलने ३५ व्या वनडे सामन्यात सहावे शतक ठोकले. त्याने ३५ डावात आतापर्यंत १९०० धावा चोपल्या आहेत. गिलने एकदिवसीय सामन्याच्या ३५ डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून रेकॉर्ड केला आहे. या शतकासह गिलने यावर्षी वनडेत १२०० धावांचा आकडाही गाठला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिलचे हे पहिले शतक आहे. याआधी त्याने आशिया कप २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. गिलच्या सहा वनडे शतकांमध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे.
गिल-अय्यरमध्ये द्विशतकी भागिदारी -
ऋतुराज गायकवाड झटपट तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शुभमन गिल आणि अय्यर दोघांनीही शतके ठोकली. अय्यर आणि गिल यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी झाली. १६४ चेंडूमध्ये या दोघांनी द्विशतकी भागिदारी केली.