(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : शुभमनला तिसऱ्या वनडेतून आराम अन् नंबर एक स्थान हुकले, बाबर अव्वल स्थानी कायम
ICC ODI Rankings : राजकोट येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा आणि अखेरचा वनडे सामना सुरु आहे
ICC ODI Rankings : राजकोट येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा आणि अखेरचा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने सलामी फलंदाज शुभमन गिल याला आराम दिला. त्यामुळे बाबर आझम याचे वनडे क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. शुभमन गिल याच्याकडे वनडे अव्वल स्थानावर झेफ घेण्याची संधी होती. आजच्या सामन्यात शुभमन गिल खेळला असता तर तो वनडेमध्ये पहिल्या स्थानावर पोहचला असता. पण त्याला आराम दिल्याचा फायदा बाबर आझमला झाला आहे. बाबर आझम वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. पण बाबर आझम आणि शुभमन गिल यांच्यामध्ये फक्त दहा गुणांचा फरक शिल्लक आहे. शुभमन गिल वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बाबर आजम आयसीसी क्रमवारीत अव्वल -
ऑस्ट्रेलियाविरोधात मोहाली वनडेत शुभमन गिल याने ७४ धावांची खेळी केली होती. तर इंदूर वनडे सामन्यात गिलने १०४ धावांची शतकी खेळी केली होती. वनडेमध्ये अव्वल स्थानावर पोहचण्यासाठी शुभमन गिल याला तिसऱ्या वनडे सामन्यात फक्त २२ धावांची गरज होती. पण त्याला आराम देण्यात आला. शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर कायम राहिला. तर बाबर आझम याचे अव्वल स्थान वाचलेय. शुभमन गिल याचे 845 रेटिंग प्वॉइंट्स आहेत. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 857 रेटिंग प्वॉइंट्ससह अव्वल स्थानावर आहे. दोघांमध्ये दहा रेटिंगचा फरक आहे. बाबर आझम आणि शुभमन गिल यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
The gap between Babar Azam and Shubman Gill reduced to just 10.
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2023
- Babar stays at the top ahead of the World Cup. pic.twitter.com/QCrP3QS3Zx
Shubman Gill Rested For 3rd ODI .
— Sir BoiesX 🕯 (@BoiesX45) September 27, 2023
Babar Azam & his teammates Rn :-#PakistanCricketTeam ||pic.twitter.com/dz0LN2M1yQ
Shubman Gill missed out the No.1 ODI ranking by just 10 Points.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2023
- The Prince is close to the No.1 spot! pic.twitter.com/X3AlOPEb6y
DUBAI 🎥
— Pakistan Cricket (@TheRealPCCB) September 27, 2023
Pakistan team celebrate the exclusion of Shubman Gill from India vs Australia 3rd ODI.
Our Babar Azam is No. 1 🎂🎉#CWC23 | #INDvAUSpic.twitter.com/6ena8246mK
शुभमन गिल आणि बाबर आझम यांचं करिअर -
शुभमन गिल याने आतापर्यंत 35 वनडे सामन्यात 66.1 च्या सरासरीने आणि 102.84 च्या स्ट्राइक रेटने 1917 धावा चोपल्या आहेत. शुभमन गिल याने वनडे फॉर्मेटमध्ये सहा शतकांची नोंद आहे. यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे. त्याशिवाय 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
बाबर आझम याने 108 वनडे सामन्यात 58.16 च्या सरासरीने आणि 89.13 च्या स्ट्राइक रेटने 5409 धावा केल्या आहेत. बाबर आझमने वनडे फॉर्मेटमध्ये 19 शतके ठोकली आहेत. तर २८ अर्धशतकांची नोंद आहे.