Shreyas Iyer Record : वेस्ट इंडीजविरुद्ध अय्यर चमकला, अर्धशतक झळकावूनही केलं अनोखं शतक
Shreyas Iyer : वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकत 54 धावा केल्या, ज्यासोबत त्याने 1000 एकदिवसीय धावा देखील पूर्ण केल्या. दुसऱ्या सामन्यातही अर्धशतक करत त्याने एक रेकॉर्ड केला आहे.
IND vs WI : भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने एक खास रेकॉर्ड नावे केला आहे. श्रेयसने सामन्यात अर्धशतक झळकावत एक खास शतक नावे केलं आहे. अय्यरने सामन्यात 4 चौकार झळकावले असून यामुळे त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 चौकारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता 29 एकदिवसीय सामन्यात 102 चौकार श्रेयसच्या नावावर झाले आहेत.
भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयसने 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत 1000 धावा पूर्ण केल्या. ज्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही त्याने एक खास रेकॉर्ड नावावर केला आहे. या सामन्यापूर्वी केवळ केवळ दोन चौकार लगावताच श्रेयस एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 चौकार पूर्ण करु शकत होता. त्यात त्याने सामन्यात 4 चौकार लगावत 100 चौकार पूर्ण केले आहेत. सध्या अय्यरने 29 सामन्यातील 26 डावात एक शतक आणि 11 अर्धशतकं झळकावत 1064 रन केले आहेत. 103 हा त्याचा सर्वोच्च एकदिवसीय स्कोर आहे.
सचिन यादीत अव्वल
दरम्यान सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्यांच्या यादीत भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. त्याने 436 सामन्यात 2016 चौकार ठोकले आहेत. तर सनथ जयसूर्या दुसऱ्य़ा स्थानी आहे. 445 सामन्यात त्याने 1500 चौकार लगावले आहेत. श्रीलंकेचाच कुमार संगकारा 1385 चौकारांसह तिसऱ्या स्थानी आहे. पण सध्या खेळणाऱ्यांमध्ये सर्वाधिक चौकार लगावणारा शिखर एकमेव खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 798 चौकार लगावले असून त्याच्यानंतर क्विंटन डी कॉक 650 चौकारांसह यादीत असून त्यानंतर सध्या खेळणाऱ्यांमध्ये इतर कोणताच खेळाडू 500 हून अधिक चौकार एकदिवसीय सामन्यात ठोकू शकलेला नाही.
हे देखील वाचा-