एक्स्प्लोर
Shai Hope : शाय होपने शानदार शतक झळकावत केली अनोखी कामगिरी, 'या' यादीत झाला सामिल
West indies vs India : वेस्ट इंडीज संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शाय होपच्या शतकाच्या जोरावरच भारतासमोर 312 धावांचे भव्य आव्हान ठेवले आहे.
IND vs WI Shai Hope : वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजने उभारलेल्या 311 धावांच्या डोंगरात सर्वाधिक धावा फलंदाज शाय होपने (Shai Hope) केल्या. त्याने 115 धावा करत शतक झळकावलं. पण हे शतक त्याच्यासाठी खास ठरलं. कारण होप त्याच्या कारकिर्दीतील 100 वा एकदिवसीय सामना खेळताना त्याने हे शतक झळकावलं आहे. होपने 135 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार ठोकत 115 धावा केल्या.
या शतकाच्या जोरावर शाय होप काही खास क्रिकेटर्सच्या यादीत तो सामिल झाला आहे. या क्रिकेटर्सनी त्यांच्या कारकिर्दीतील 100 व्या एकदिवसीय सामन्यात 100 हून अधिक धावा ठोकल्या आहेत. या यादीत वेस्ट इंडीजचाच ख्रिस गेल अव्वल स्थानी असून त्याने इंग्लंडविरुद्ध 2004 मध्ये 132 धावा केल्या होत्या.
100 व्या एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च स्कोर
खेळाडू | धावा | सामना |
ख्रिस गेल | 132 | वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड (2004) |
मोहम्मद यूसुफ | 129 | पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (2002) |
डेविड वॉर्नर | 124 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2006) |
ख्रिस केर्न्स | 115 | भारत विरुद्ध न्यूझीलंड (1999) |
रामनरेश सरवन | 115 | भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (2006) |
शाय होप | 115 | भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (2022) |
हे देखील वाचा-
- IND vs WI, 2nd ODI Playing 11 : युवा गोलंदाज आवेश खानचं एकदिवसीय सामन्यात पदार्पण, दुसऱ्या वन-डेसाठी कसा आहे भारतीय संघ?
- IND vs WI, 2nd ODI, Toss Update : आजही नाणेफेक वेस्ट इंडीजच्याच बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- ICC T20 World Cup 2022 : 'विश्वचषकात भारताला कोहलीची गरज पडणार', अजित आगरकरने सांगितलं कारण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement