एक्स्प्लोर

रचनाच्या प्रेमात 'कृष्णा'ची पडली विकेट, श्रेयस अय्यर-बुमराह लग्नाला उपस्थित

Prasidh Krishna Marriage : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा लग्नबंधनात अडकला आहे.

Prasidh Krishna Marriage : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा लग्नबंधनात अडकला आहे. प्रेयसी रचनासोबत प्रसिद्ध कृष्णाने लग्न उरकलेय. मंगळवारी प्रसिद्ध कृष्णा आणि रचना यांचा साखरपुडा झाला होता. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. साखरपुड्यानंतर दोन दिवसात प्रसिद्ध कृष्णा याने लग्न उरकलेय. 

प्रसिद्ध कृष्णा आणि रचना गेल्या काही दिवसांपासून एकमेंकाट डेट करत होते. या लव्हबर्डने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला. आठ जून रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.  यात प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि त्यांची पत्नी पुष्पहार घालताना दिसत आहेत. यावेळी कृष्ण पारंपारिक पेहरावात दिसतोय.

View this post on Instagram
 
A post shared by Indian Cricket Team 🇮🇳 (@indiacricket.in)

View this post on Instagram
 
A post shared by cricket fans (@indian_cricketer_______)

View this post on Instagram
 
A post shared by Gourav Achar (@gourav_achar)

प्रसिद्ध कृष्णा आणि रचना यांच्या विवाहाला अनेक खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि मयांक अग्रवाल यांचा समावेश आहे. देवदत्त पडिक्कल याच्यासह कर्नाटक संघाचे अनेक खेळाडू लग्नाला उपस्थित होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

आयपीएलमध्ये प्रसिद्ध कृष्णा राजस्थान रॉयल्सच्या संघाचा सदस्य आहे. पण यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे तो आयपीएलला मुकला होता.   आयपीएल 15 चा हंगाम प्रसिद्धसाठी दमदार राहिला होता. प्रसिद्धने भेदक मारा केला होता. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या प्रसिद्ध कृष्णा याने 2021 मध्ये टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. प्रसिद्ध कृष्णा याने 14 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलेय. इंग्लंडविरोधात पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात 25 बळी घेतले आहेत. कसोटी आणि टी 20 क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णा याला अद्याप संधी मिळालेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णा याने चांगली कामगिरी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget