Shreyas Iyer Century : 6,6,6,6,6,6... श्रेयस अय्यरचा धमाका! 50 चेंडूत ठोकले तुफानी शतक; षटकार-चौकारांचा पाऊस
Shreyas Iyer 51-ball century in Vijay Hazare Trophy : श्रेयस अय्यरने भारताच्या देशांतर्गत वनडे टूर्नामेंट विजय हजारे ट्रॉफीमध्ये तांडव घातला आहे.
Vijay Hazare Trophy 2024-25 : श्रेयस अय्यरने भारताच्या देशांतर्गत वनडे टूर्नामेंट विजय हजारे ट्रॉफीमध्ये तांडव घातला आहे. मुंबईचा कर्णधार असलेल्या अय्यरने कर्नाटकच्या गोलंदाजांची चांगलाच समाचार घेतला. आणि त्याने अवघ्या 50 चेंडूत शतक ठोकले. अय्यरने 55 चेंडूत 114 धावांची खेळी खेळली, त्याच्या या खेळीमुळे मुंबई संघाने पहिल्या डावात 382 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यासह त्याने पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात आपला दावा आधीच पक्का केला.
HUNDRED BY SHREYAS IYER. 🙇♂️
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 21, 2024
- A century in just 51 balls with 5 fours and 9 sixes by Iyer in the Vijay Hazare Trophy. A classic Iyer show at the Narendra Modi Stadium. ⭐ pic.twitter.com/WiwaVLXiQk
श्रेयस अय्यरने धडाकेबाज शतक
रणजी ट्रॉफी आणि नंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कहर करणाऱ्या श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आणि कर्नाटकविरुद्ध जबरदस्त शतक झळकावले. श्रेयसने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर तो अजूनच आक्रमक झाला आणि षटकार-चौकारांचा पाऊस पाडला आणि अवघ्या 50 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अय्यरने 207 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 55 चेंडूत फलंदाजी केली आणि नाबाद राहताना 114 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 10 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.
श्रेयस अय्यरने कसोटी आणि टी-20 मध्ये टीम इंडियाच्या संघातील स्थान गमावले असेल, परंतु वनडेमध्ये त्याचा दावा अजूनही मजबूत आहे. श्रेयसला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा दावेदारही मानला जात आहे आणि निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी तो निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.
CAPTAIN SHREYAS IYER MADNESS IN VIJAY HAZARE TROPHY 🌟
— Johns. (@CricCrazyJohns) December 21, 2024
- Captain Shreyas smashed 114* runs from just 55 balls including 5 fours & 10 sixes against Karnataka. What a player, great news for Team India in 2025 season. pic.twitter.com/DfO24W6RvJ
मुंबईने मोठी उभारली धावसंख्या
शनिवार 21 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. स्पर्धेची पहिली फेरी सुरू आहे, ज्यामध्ये 18 सामने खेळले जात आहेत. क गटात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई आणि कर्नाटक यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्याबद्दल बोलायचे तर, मुंबई संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 4 बाद 382 धावा केल्या. श्रेयस अय्यरशिवाय हार्दिक तामोरेने 94 चेंडूत 84 धावांची तर आयुष म्हात्रेनेही 82 चेंडूत 78 धावांची खेळी खेळली. शिवम दुबेनेही 36 चेंडूत 63 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली.
HUNDRED FOR SHREYAS IYER...!!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) December 21, 2024
- Hundred from just 50 balls against Karnataka in the Vijay Hazare Trophy, Captain leading Mumbai by an example in all formats.
Great news for Team India in Champions Trophy 🇮🇳 pic.twitter.com/8Vf9vnHDOS
हे ही वाचा -