Shane Warne Passes Away : शेन वॉर्नच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन नव्हता; विराटसह 'या' खेळाडूंचं होतं नाव
Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने थायलंड (Thailand) येथे निधन झाले आहे.
![Shane Warne Passes Away : शेन वॉर्नच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन नव्हता; विराटसह 'या' खेळाडूंचं होतं नाव Shane Warne Passes Away shane warne does not consider sachin tendulkar great considers these 5 batsmen to be best Shane Warne Passes Away : शेन वॉर्नच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन नव्हता; विराटसह 'या' खेळाडूंचं होतं नाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/04/e8379dc5773530af153c6dc786be4638_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. संपूर्ण जग भारताचा फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला महान खेळाडू मानत होते. परंतु, 100 शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नच्या सर्वोत्तम पाच फलंदाजांच्या यादीत स्थान देण्यात आले नव्हते. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील संबंध क्रिकेटच्या मैदानावर फारसे सौहार्दाचे राहिलेले नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर यांच्यात जोरदार टक्कर होत असे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकवणारा सचिन तेंडुलकर हा जगातील एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने दोनशे पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले असून कसोटीत सचिनने 51 शतके आणि 15 हजार 921 धावा केल्या आहेत. मात्र, शेन वॉर्नने आपल्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम पाच फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला स्थान दिले नाही. शेन वॉर्नने सध्याच्या काळातील टॉप पाच कसोटी क्रिकेटपटूंची यादी तयार केली होती. शेन वॉर्नने विराट कोहलीची जगातील टॉप पाच कसोटी फलंदाजांमध्ये निवड केली होती.
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून निवडले होते. फॉक्स क्रिकेटने इंस्टाग्रामवर शेन वॉर्नचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये वॉर्नने टेस्ट फॉरमॅटमध्ये सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला अग्रस्थानी ठेवले होते. याशिवाय, जो रूट, केन विल्यमसन, विराट कोहली आणि मार्नस लॅबुशेन यांना शेन वॉर्नने पाच सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून निवडले होते.
महत्वाच्या बातम्या
- Shane Warne Passes Away : आयपीएलच्या सुरूवातीला राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नवर लावली होती सर्वात मोठी बोली
- Shane Warne Passes Away : फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन
- Shane Warne: सचिन माझ्या स्वप्नात यायचा आणि गोलंदाजीवर धुलाई करायचा; शेन वॉर्नने दिली होती कबुली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)