IND vs SL: भारत- श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पावसामुळं रद्द होण्याची शक्यता
IND vs SL: भारत- श्रीलंका यांच्यात आज (26 फेब्रुवारी) दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आजचा सामना रंगणार आहे.
IND vs SL: भारत- श्रीलंका यांच्यात आज (26 फेब्रुवारी) दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. धर्मशाला (Dharamshala) येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Himachal Pradesh Cricket Association Stadium) आजचा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी सज्ज झालाय. तर, तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना निराश करणारी माहिती समोर येत आहे. आजच्या सामन्यावर पावसाचं सावट असून भारत-श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
धर्मशाळेत आज पाऊस पडण्याची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज संध्याकाळी धर्मशाळेत पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळं भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना रद्द होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळण्यात आलेल्या सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता. धर्मशाला येथे मार्च 2016 शेवटचा आतंरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता.
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 62 धावांनी विजय
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेला 62 धावांनी धूळ चारली. आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं भारतीय संघ युवा फळीची चाचपणी करत आहे. दुसरीकडे अनेक प्रमुख खेळाडू विविध कारणास्तव संघाबाहेर गेल्यामुळं श्रीलंकेच्या चिंतेत भर पडलीय.
संघ-
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार.
श्रीलंकेचा संघ: दसुन शनका (कर्णधार), पथुम निसंका, चरिथ असलंका, दिनेश चंडिमल, कुशल मेंडिस, दानुष्का गुणथिलका, कमिल मिशारा, जनिथ लियांगे, चमिका करुणारत्ने, दुश्मंता चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नाडो, शिरान फर्नाडो, महीष थिक्षणा, प्रवीण जयविक्रमा, अशियान डॅनिएल, जेफ्री वॉडर्से.
हे देखील वाचा-
- IND vs SL : दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
- IND vs SL : दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील वादाचा फटका फुटबॉलला, चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत महत्त्वाचा बदल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha