एक्स्प्लोर

पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!

Sarfaraz Khan : भारतीय संधाचा फलंदाज सरफराज खान याने इराणी चषकात द्विशतकी खेळी करत दमदार कामगिरी केली आहे.

Sarfaraz Khan : भारतीय संघाचा युवा खेळाडू सरफराज खान (Sarfaraz Khan) याने इराणी चषकात झंझावाती द्विशतक झळकावलंय. सरफराजच्या (Sarfaraz Khan) खेळीच्या जोरावर मुंबईने 525 धावांचा टप्पा पार केलाय. पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानने दमदार फलंदाजी करत द्विशतकी खेळी केली आहे. मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन संघांमध्ये कसोटी सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात सर्फराजने धमाकेदार फलंदाजी केली आहे. 

बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत सर्फराज खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान नाही

काही दिवसांपूर्वी भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. मात्र, या मालिकेत सरफराज खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आली नव्हते. दरम्यान इराणी चषकामध्ये या खेळाडूंना संधी मिळावी यासाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला होता. बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीचा चौथा दिवस सुरु असताना बीसीसीआयने सरफराज खानसह, ध्रुव जुरेल आणि यश दयाल या तीन खेळाडूंना संघातून वगळले होते. दरम्यान, आता सरफराज खानने द्विशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. सरफराज खानने आतापर्यंत डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 14 अर्धशतक आणि 15 शतक ठोकले आहेत. 

काही दिवसांपूर्वी सरफराज खानच्या भावाचा झाला होता अपघात 

भारताचा फलंदाज सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. कारने वडिलांसोबत कानपूरहून लखनौला रवाना होत असताना हा भीषण अपघात झाला होता. अपघात एवढा भीषण होता की, त्यांची कार तीन ते चार वेळेस उलटली होती. या अपघातानंतर मुशीरने 3 महिने क्रिकेटपासून दूर राहावे अशा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. मुशीर खान याच इराणी स्पर्धेत मुंबईच्या संघाकडून खेळणार होता. दरम्यान, मुशीरला या स्पर्धेत खेळता आले नसले तरी सरफराजने द्विशतकी खेळी करत सर्वांची मनं जिंकली आहेत. 

अजिंक्य रहाणेची 97 धावांची खेळी 

सरफराज खान शिवाय मुंबईकडून अजिंक्य राहणे यांनेही दमदार कामगिरी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अजिंक्य रहणे याने 97 धावा कुटल्या. मात्र, अजिंक्य रहाणेचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. तो यश दयालच्या शिकार झाला. त्याने 234 चेंडूत 97 धावा करत दमदार कामगिरी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना 'या' मतदारसंघातून उमेदवारी द्या, दंगलीचा डाग पुसला जाईल, सामाजिक कार्यकर्त्याचं पवारांना पत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChandrapur : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचारNanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
Prashant Kishore : बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
Govinda : यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
Embed widget