एक्स्प्लोर

Sa vs Ind 3rd T20 : 13 षटकार, 15 चौकार अन् 219 धावा... भारताने दक्षिण आफ्रिकेला दिले 220 धावांचे लक्ष्य, तिलक वर्माने ठोकले शतक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे.

South Africa vs India 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिलक वर्माची 107 धावांची शतकी खेळी आणि अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर तिसऱ्या टी-20 सामन्यात 220 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने 20 षटकांत 6 बाद 219 धावा केल्या. यादरम्यान, भारतीय खेळाडूंनी 13 षटकार आणि 15 चौकार मारले. भारतासाठी तिलक वर्माने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, ज्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. दक्षिण आफ्रिकेतर्फे अँडिले सिमलेने आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन, तर मार्को जेन्सेनला एक विकेट मिळाली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीच्या षटकातच संजू सॅमसनची विकेट गमावली. सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात खातेही न उघडता बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक आणि तिलक वर्माने डावाची धुरा सांभाळली आणि दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक 25 चेंडूत 50 धावा करून बाद झाला.

तिलक वर्मा 56 चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 107 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने एका धावेचे, हार्दिक पंड्याने 18 धावांचे, रिंकू सिंगने आठ धावांचे आणि रमणदीप सिंगने 15 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी अक्षर पटेल एक धाव काढून नाबाद परतला.

हे ही वाचा -

Abhishek Sharma : 6,6,6,6,6.... अभिषेक शर्माने टीकाकारांना मैदानातच दिले सडेतोड उत्तर, 24 चेंडूत ठोकले अर्धशतक

Sanju Samson IND vs SA : 'हिरो' झाला 'झिरो', दोन शतके अन् नंतर सलग दोन बदक... 'ही' लाजिरवाणी कामगिरी करणारा संजू पहिला खेळाडू

 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shreyanka Patil News : टीम इंडियाच्या LIVE मॅचमध्ये मोठा अनर्थ! श्रेयंका पाटीलला स्टेचरवरून बाहेर घेऊन जावं लागलं; नेमकं काय घडलं? BCCI ने दिली अपडेट
टीम इंडियाच्या LIVE मॅचमध्ये मोठा अनर्थ! श्रेयंका पाटीलला स्टेचरवरून बाहेर घेऊन जावं लागलं; नेमकं काय घडलं? BCCI ने दिली अपडेट
Ind vs Afg 2nd ODI : एकाच दिवसात भारताने अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा लोळावलं; टीम इंडियाचा 170 धावांनी दणदणीत विजय, मालिकाही खिशात!
एकाच दिवसात भारताने अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा लोळावलं; टीम इंडियाचा 170 धावांनी दणदणीत विजय, मालिकाही खिशात!
Ind vs Afg 2nd ODI Update : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकली! दुसऱ्या वनडेत 107 धावांनी अफगाणचा उडवला धुव्वा, मालिका खिशात
Ind vs Afg 2nd ODI Update : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकली! दुसऱ्या वनडेत 107 धावांनी अफगाणचा उडवला धुव्वा, मालिका खिशात
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दोषी! श्रीलंकेत नको नको ते कृत्य केलं, BCCIच्या टेबलावर पोहोचलं प्रकरण, तिलक वर्माही सुट्टी नाही
वैभव सूर्यवंशी दोषी! श्रीलंकेत नको नको ते कृत्य केलं, BCCIच्या टेबलावर पोहोचलं प्रकरण, तिलक वर्माही सुट्टी नाही

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran Deal : अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, भारतात पेट्रोल डिझेल किती रुपयांना?
अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, चीन ते नेपाळपर्यंत दर घटले, भारतात काय?
US Iran Peace Deal MOU: अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले 'It's signed'
अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले 'It's signed'
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात
Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
Embed widget