एक्स्प्लोर

चांगली कामगिरी करुनही संधी नाही, ऋतुराज गायकवाडवरुन वाद; अजित आगरकरांनी सांगितलं यामागील कारण

Ajit Agarkar On Ruturaj Gaikwad: आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे.

Ajit Agarkar On Ruturaj Gaikwad: टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती करण्यात आली. आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे. यासाठी काल टीम इंडिया श्रीलंकेला रवाना झाली. मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी अशा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांची कदाचित कोणालाच अपेक्षा नव्हती. तसेच झिम्बॉब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. यावरुन भारतीय क्रिकेट संघाच्या अनेक माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित करत बीसीसीआयवर टीका केली. या टीकेवर देखील अजित आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

...म्हणून ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माची निवड नाही-

ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासारख्या खेळाडूंना चांगली कामगिरी करुनही संधी न मिळाल्याबद्दल अजित आगरकर म्हणाले, संघातून वगळलेल्या कोणत्याही खेळाडूला वाईट वाटेल, पण आमचे काम फक्त 15 खेळाडूंना निवडण्याचे आहे. रिंकूकडेच बघा, टी-20 विश्वचषकापूर्वी त्याने चांगली कामगिरी केली होती. पण त्याला टी-20 संघात स्थान मिळवता आले नव्हते. आम्ही फक्त 15 खेळाडू निवडू शकतो, असं अजित आगरकर यांनी सांगितले. 

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशन, अंगावर टॅटू असेल तरच टीम इंडियात स्थान-

झिम्बॉब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. यावरुन भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एस. बद्रीनाथ बीसीसीआयवर चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले.  क्रिक डिबेट विथ बद्रीवर बोलताना म्हणाला की, काहीवेळा कामगिरीव्यतिरिक्त संघात स्थान मिळवण्यासाठी दुसरी प्रतिमा देखील आवश्यक असल्याचं आता वाटतंय. ऋतुराज गायकवाडसारख्या खेळाडूची टीम इंडियात निवड होत नाही. त्यामुळे संघात स्थान मिळवायचं असेल तर तुमचं बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर रिलेशन असणं, प्रसारमाध्यमांबरोबर तुम्हाला नीट संगनमत करता येणं आणि अंगावर टॅट्यू असणं गरजेचं आहे का?, असा सवाल ब्रदीनाथने उपस्थित केला. दरम्यान ऋतुराजने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये 7,77 आणि 49 धावा केल्या होत्या. त्याला शेवटच्या म्हणजेच पाचव्या टी-20 सामन्यात संधी देण्यात आलेली नव्हती. 

संबंधित बातम्या:

रंगेहाथ पकडलं अन्...; हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget