एक्स्प्लोर

रोहित शर्मा कॅप्टन व्हायला तयार नव्हता अन् आता... टी 20 वर्ल्ड कप फायनलपूर्वी सौरव गांगुलीनं गुपित फोडलं

Rohit Sharma : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचा माजी चेअरमन सौरव गांगुली यानं टी 20 वर्ल्ड कप फायनलपूर्वी रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

कोलकाता : टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीच्या लढतीत भारत आणि दक्षिण आफ्रिका(Ind vs South Africa) आमने सामने येणार आहे.  भारताकडे 2007 नंतर पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे.तर, 2013 नंतर भारताला अनेक प्रयत्न करुन देखील आयसीसी स्पर्धांचं विजेतेपद मिळवता आलेले नाही. आज टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत विजय मिळवून आयसीसी स्पर्धांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीम इंडियाकडे आहे. भारताचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचा माजी चेअरमन सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 

सौरव गांगुलीनं एका कार्यक्रमात म्हटलं की, रोहित शर्मासाठी खूप आनंदी आहे. हेच जीवनाचं चक्र आहे, सहा महिन्यांपूर्वी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन देखील नव्हता. आता रोहितच्या नेतृत्त्वात भारत टी 20 वर्ल्ड कपची अंतिम फेरीची लढत खेळणार आहे. विराट कोहलीनं वेळी कॅप्टनपद सोडल्यानंतर रोहित शर्मा ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हता. 

रोहित शर्मानं दोन वर्ल्ड कप फायनल खेळल्या आहेत. आतापर्यंत रोहितच्या टीमला कोणीही पराभूत करु शकलेलं  नसून ते स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत. यातून रोहित शर्माच्या नेतृत्व गुणांचं दर्शन होतं. मला रोहित शर्माच्या यशाबद्दल आश्चर्य वाटत नाही कारण त्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. 

विराट कोहलीला त्यावेळी कॅप्टन राहायचं नव्हतं.तेव्हा रोहित शर्माला कॅप्टन पदाची जबाबदारी घेण्यास तयार करण्यासाठी खूप वेळ लागल्याचं सौरव गांगुलीनं सांगितलं. कारण, रोहित शर्मा त्यावेळी कॅप्टनपद स्वीकारण्यास तयार नव्हता, असं दादानं सांगितलं. 

रोहित शर्माला कॅप्टन करण्यामध्ये आम्हा सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागली. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेटची प्रगती पाहून खूश असल्याचं देखील सौरव गांगुलीनं म्हटलं. 

आयपीएलची स्पर्धा खूप वेळ चालत असल्यानं त्याचं विजेतेपद मिळवणं अनेकदा खूप आव्हात्मक असतं, असंही सौरव गांगुलीनं म्हटलं. रोहित शर्मानं पाचवेळा आयपीएल विजेतेपद जिंकलं आहे, हे देखील सर्वात मोठं यश आहे. आयपीएल जिंकणे देखील अनेकदा कठीण असतं, असंही गांगुली म्हणाला. 

तुम्हाला आयपीएल जिंकण्यासाठी 16-17 मॅच जिंकायच्या असतात. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आठ ते नऊ सामने जिंकण्याची गरज असते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तुम्हाला अधिक सन्मान मिळतो. रोहित शर्मा भारताला विजेतेपद मिळवून देईल, असा विश्वास असल्याचं गांगुली म्हणाला. 

सौरव गांगुली म्हणाला की  सात महिन्यात रोहित शर्मा दुसरी वर्ल्ड कप फायलन हरणार नाही.तसं झालं तर तो बारबाडोसच्या महासागरात उडी मारेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारत विजयानं अभियानाचा समारोप करेल, असं  सौरव गांगुली म्हणाला. 

संबंधित बातम्या : 

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाईAnjali Damania on Beed | गरज नसलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, पोलीस खात्याचा दुरूपयोग- दमानियाSatish Wagh Pune murder case | सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम Abp MajhaUnique Farmer Id Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिट फार्मर आयडी Abp Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Embed widget