Ind vs Aus 4th Test : 'गल्ली क्रिकेट खेळतोयस का?' LIVE मॅचमध्ये रोहित शर्माने मुंबईच्या भाषेत जैस्वालला सुनावले, पाहा Video
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये खेळला जात आहे.
Ind vs Aus 4th Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली होती, मात्र हळूहळू भारतीय गोलंदाज दमदार पुनरागमन करत आहेत. दरम्यान, सतत विकेट शोधत असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने यशस्वी जैस्वालला सुनावले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रोहितने जैस्वालला क्षेत्ररक्षण कसे करायचे हे समजावून सांगितले.
जडेजाच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने फॉरवर्ड डिफेन्स केला, जैस्वालच्या उजव्या बाजूने चेंडू गेला. स्मिथने शॉट खेळताच जैस्वालने चेंडूकडे जाण्याऐवजी उडी मारली आणि त्यावर रोहितने त्याला चांगले सुनावले. रोहित म्हणाला, "ओ जैस्वाल तु गल्ली क्रिकेट खेळतोय का? खाली बसून राहा, बॉल खेळेपर्यंत उठू नकोस. खाली बसून राहा." स्टार स्पोर्ट्सने हा मजेदार कॉमेंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहेत.
Stump Mic Gold ft. THE BEST, @ImRo45! 🎙️😂
— Star Sports (@StarSportsIndia) December 26, 2024
The Indian skipper never fails to entertain when he’s near the mic! 😁#AUSvINDOnStar 👉 4th Test, Day 1 LIVE NOW pic.twitter.com/1fnc6X054a
जेव्हा रोहित शर्मा मैदानावर असतो तेव्हा तो अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. जेव्हा तो बोलतो तेव्हा तो प्रत्येक वेळी काहीतरी मजेदार बोलतो, परंतु काहीवेळा न बोलता तो काहीतरी करतो ज्याचा व्हिडिओ लोकांना खूप आवडतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच पिंक बॉलने सराव सामना खेळला जात असताना रोहितने विकेटच्या मागे असेच काहीसे केले होते.
काही कारणास्तव सर्फराज खान यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळत होता, यादरम्यान त्याला चेंडू पकडता आला नाही. यानंतर रोहितने त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि हसत हसत काहीतरी बोलला. यानंतर सर्फराजनेही त्याला काही स्पष्टीकरण दिले आणि विकेटच्या मागे उपस्थित असलेले सर्वजण खूप हसले.
“Game-changer player is only one guy JASPRIT BUMRAH!" 💪😎#TravisHead "leaves" without troubling the scorers! 🫢#AUSvINDOnStar 👉 4th Test, Day 1 | LIVE NOW! | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/p6a0gzc3BB
— Star Sports (@StarSportsIndia) December 26, 2024
हे ही वाचा -