Ind vs Aus 4th Test: जाळ अन् धूर सोबतच! सॅम कॉन्स्टासचा राग काढला हेडवर, बुमराहनं ऑस्ट्रेलियाच्या संकटमोचकाला शुन्यावर केलं 'क्लीन बोल्ड', पाहा Video
ट्रॅव्हिस हेडला बुमराहने क्लीन बोल्ड केले आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
Travis Head Was Clean Bowled By Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह हा क्रिकेट जगतातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा टीम इंडिया कठीण परिस्थितीत असते तेव्हा तेव्हा भारतीय कर्णधार बुमराहकडे बॉल देतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह फलंदाजीला आला तेव्हाही असेच काहीसे घडले. टीम इंडिया मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून टीम इंडियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सॅम कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले.
यादरम्यान त्याने 4483 चेंडूंनंतर बुमराहविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये षटकार मारला. कॉन्स्टासने सामन्याच्या 6.2 षटकात हा षटकार लगावला. सॅम कॉन्स्टास तिथेच थांबला नाही. त्याने बुमराहविरुद्ध आणखी एक षटकार ठोकला. 10व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने हा षटकार मारला. या सगळ्याचा राग जसप्रीत बुमराहने हेडवर काढला, बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये सतत धावा करणाऱ्या हेडला बुमराहने क्लीन बोल्ड केले आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातील ट्रॅव्हिस हेडच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, तो कांगारू संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात त्याने एकूण सात चेंडूंचा सामना केला, मात्र त्याला खातेही उघडता आले नाही. 67व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बुमराहने त्याला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात हेड आपल्या संघाचा चौथा फलंदाज म्हणून बाद झाला.
“Game-changer player is only one guy JASPRIT BUMRAH!" 💪😎#TravisHead "leaves" without troubling the scorers! 🫢#AUSvINDOnStar 👉 4th Test, Day 1 | LIVE NOW! | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/p6a0gzc3BB
— Star Sports (@StarSportsIndia) December 26, 2024
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडला नक्कीच काही विशेष दाखवता आले नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. हेडने आतापर्यंतच्या सर्व सामने खेळले आहेत. दरम्यान, सहा डावात त्याच्या बॅटमधून 409 धावा केल्या आहेत.
मेलबर्न कसोटीतही बुमराहचा कहर
जसप्रीत बुमराहच्या मेलबर्न कसोटीतील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची जादू येथेही दिसून येते. या स्टार वेगवान गोलंदाजाने 18 षटके टाकली आहेत. दरम्यान, त्याने 3.60 च्या इकॉनॉमीमध्ये 64 धावा देत तीन विकेट घेतल्या आहेत. बुमराहशिवाय उस्मान ख्वाजा आणि मिचेल मार्शला आऊट केले आहे.
हे ही वाचा -