T20 World Cup 2024 : बारबाडोसच्या पिचची माती का खाल्ली ,BCCI च्या व्हिडीओत हिटमॅननं गुपित सांगितलं
Rohit Sharma: रोहित शर्मानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बारबाडोसच्या खेळपट्टीवरील माती खाल्ली होती. बीसीसीआयच्या एका व्हिडीओत रोहित शर्मानं कारण सांगितलं आहे.
नवी दिल्ली : भारतानं (Team India) बारबाडोसच्या केंसिंग्टन ओवलमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 7 धावांनी पराभूत केलं. भारतानं 2011 नंतर आयसीसीचा वर्ल्ड कप जिंकला. तर, 2007 नंतर भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला. या विजयानंतर रोहित शर्मानं (Rohit Sharma) बारबाडोसच्या पिचवरील माती खाल्ली होती. रोहित शर्मानं बीसीसीआयच्या एका व्हिडीओत त्याचं कारण सांगितलं आहे.
भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. खेळाडू जल्लोष करण्यात व्यस्त असताना रोहित शर्मानं गुपचूप पणे बारबाडोसच्या खेळपट्टीवर जाऊन तिथली माती खाल्ली. रोहित शर्मानं माती खाल्ल्याचं कारण सांगितलं आहे.
भारतानं 17 वर्षानंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. रोहित शर्मा म्हणाला की तुम्हाला माहिती आहे मला त्यावेळी वाटलं की या पिचनं आपल्याला ट्रॉफी दिलेली आहे.आम्ही त्या विशेष खेळपट्टीवर खेळलो आणि मॅच जिंकलो. मी माझ्या आयुष्यात बारबाडोसचं मैदान आणि खेळपट्टीला कायम स्मरणात ठेवेन, त्यासाठी त्याचा एक भाग माझ्यासोबत ठेवायचा होता. ते क्षण खास आहेत. त्या ठिकाणी आपली सर्व स्वप्न पूर्ण झाली. त्या खेळपट्टीचा काही भाग हवा होता, ही भावना बारबाडोसची माती खाण्यामागं होती, असं रोहित शर्मानं म्हटलं.
💬💬 𝙄𝙩 𝙝𝙖𝙨𝙣'𝙩 𝙨𝙪𝙣𝙠 𝙞𝙣 𝙮𝙚𝙩
— BCCI (@BCCI) July 2, 2024
The celebrations, the winning gesture and what it all means 🏆
Captain Rohit Sharma takes us through the surreal emotions after #TeamIndia's T20 World Cup Triumph 👌👌 - By @Moulinparikh @ImRo45 | #T20WorldCup pic.twitter.com/oQbyD8rvij
रोहित शर्माला केलेल्या सेलिब्रेशन बद्दल विचारलं असता, टी 20 वर्ल्ड कप नंतरच्या सेलिब्रेशनचं वर्णन करु शकत नाही. ते काही निश्चित ठरलेलं नव्हतं. नैसर्गिकरित्या भावना समोर येत होत्या असं रोहित शर्मा म्हणाला.
💬💬 𝙄𝙩 𝙝𝙖𝙨𝙣'𝙩 𝙨𝙪𝙣𝙠 𝙞𝙣 𝙮𝙚𝙩
— BCCI (@BCCI) July 2, 2024
The celebrations, the winning gesture and what it all means 🏆
Captain Rohit Sharma takes us through the surreal emotions after #TeamIndia's T20 World Cup Triumph 👌👌 - By @Moulinparikh @ImRo45 | #T20WorldCup pic.twitter.com/oQbyD8rvij
आयसीसी स्पर्धा जिंकणारा तिसरा भारतीय
भारतानं आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 17 वर्षानंतर जिंकला. भारतानं आयसीसी वनडे वर्ल्ड कप 1983 ला कपिल देवच्या नेतृत्त्वात जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षांनी महेंद्रसिंह धोनीनं 2011 मध्ये भारतानं वनडे वर्ल्ड कप जिंकला. त्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्याच नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं 2007 मध्ये पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं धोनीच्या नेतृत्त्वाखाली जिंकली.
यानंतर जवळपास 11 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला.
रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानावर अफगाणिस्तानाचा रहमानुल्लाह गुरबाझनं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांना निवृत्ती जाहीर केली.
संबंधित बातम्या :