Rohit Sharma-Ritika Sajdeh Baby Boy : नवा क्रिकेटर आला, छोटी बॅट, छोटे पॅड.., रोहितभाऊ बाबा होताच टीम इंडियाचा आनंद गगनात मावेना, BCCI ने शेअर केला व्हिडीओ!
टीम इंडियाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा बाबा झाला.
Rohit Sharma Ritika Sajdeh blessed with Baby Boy : भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार सामन्यांची टी-20 मालिका खेळली. या मालिकेत टीम इंडियाने यजमान देशाचा 3-1 असा पराभव केला. भारतीय संघाच्या विजयासह अनेक विक्रम मोडीत निघाले. टीम इंडियाने या मालिकेतील चौथ्या सामन्यात 283 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 135 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंनी शतके झळकावली. ज्यामध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या नावाचा समावेश होता. या दोन्ही फलंदाजांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारताने सामना सहज जिंकला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात तिलक वर्मा सामनावीर ठरला. या सामन्यात संजू सॅमसनने 109 धावांची नाबाद खेळी तर तिलक वर्माने 120 धावांची नाबाद खेळी केली. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव खूपच खूश दिसत होता आणि त्याने या दोन खेळाडूंसोबत खास बातचीत केली. जिथे त्याने दोघांना त्यांचा अनुभव विचारला. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्याशी संवाद साधताना सूर्याने प्रथम संजूला दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल विचारले. यावर संजूने उत्तर दिले की, हा दौरा त्याच्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यानंतर तिलक वर्मा यांच्याशी त्याच्या केसांबद्दल चर्चा झाली, तो साऊथ फिल्म स्टार अल्लू अर्जुनसारखा दिसतो. अशा परिस्थितीत सूर्याने त्याला पुष्पा 3 चित्रपटात काम करायचे आहे का, असे सुर्याने विचारले. त्यावर तिलक म्हणाला की, मला फक्त क्रिकेट खेळायचे आहे.
रोहितभाऊ बाबा होताच टीम इंडियाचा आनंद गगनात मावेना
टीम इंडियाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा बाबा झाला. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने मुलाला जन्म दिला आहे. सूर्याने तिलक वर्मा यांना रोहित शर्माचे अभिनंदन केले. तिलक म्हणाला की, लवकच भेटू. संजू सॅमसननेही रोहित शर्माचे अभिनंदन केले आहे. त्यावेळी भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणाला की, नवा क्रिकेटर आला, छोटी बॅट छोटे पॅड घेऊन चला.
Jersey number secret, hairdo and a special message for #TeamIndia Captain @ImRo45 🤗
— BCCI (@BCCI) November 16, 2024
Skipper SKY interviews 'Humble' centurions @IamSanjuSamson & @TilakV9 💯
WATCH 🎥 🔽 #SAvIND | @surya_14kumar
हे ही वाचा -