Rohit Sharma Retirement: मैं पल दो पल का शायर हूँ...; MS धोनी अन् रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीचं सेम टू सेम टाइमिंग
Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा आणि एमएस धोनीचे भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे.

Rohit Sharma Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Retirement) याने काल (7 मे) कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढे टीम इंडियासाठी वनडे क्रिकेट खेळत राहणार असल्याचं देखील रोहित शर्माने स्पष्ट केले.
NEWS - BCCI congratulates Rohit Sharma on a glorious Test career.
— BCCI (@BCCI) May 7, 2025
Details here - https://t.co/kePvOupezF #RohitSharma
रोहित शर्माच्या या तडकाफडकी निवृत्तीच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या कसोटी निवृत्तीबाबत एक योगायोग समोर आला आहे. एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटचे दिग्गज राहिले आहेत. रोहित शर्मा आणि एमएस धोनीचे भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. याचवेळी एमएस धोनी आणि रोहित शर्माच्या निवृत्तीमध्ये काही साम्य असल्याचे दिसून येत आहे.
एमएस धोनी अन् रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीचं सेम टू सेम टाइमिंग-
- एमएस धोनी आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून घेतलेली वेळ- संध्याकाळी 7.29 वाजता (1929)
- एमएस धोनी आणि रोहित शर्माने शेवटची आंतरराष्ट्रीय कसोटी सामना भारतात मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळला होता.
- एमएस धोनी आणि रोहित शर्माने शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना परदेशात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर खेळला होता.
निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्मा काय म्हणाला?
इन्स्टाग्रामवर कसोटी कॅपसह फोटो शेअर करीत रोहितने लिहिले, 'सर्वांना नमस्कार...मी केवळ शेअर करू इच्छितो की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या जर्सीत देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी फार सन्मानाची बाब ठरली. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी वनडेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्माची कसोटी कारकीर्द कशी राहिली?-
रोहित शर्मा याने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने तेव्हापासून गेली 12 कसोटी संघांचं प्रतिनिधित्व केलं. तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. रोहितने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4 हजार 302 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 88 षटकार आणि 473 चौकार लगावले. रोहितने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावलं होतं. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.



















