(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma : रोहित शर्माच्या करिअरमधील 5 सर्वोत्कृष्ट क्षण कोणते? हिटमॅनने केली 'मन की बात'
Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे.
Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. जगभरातील आघाडीच्या फलंदाजांमध्ये रोहित शर्माचे नाव घेतले जाते. मागील 16 वर्षात रोहित शर्माने यशाची अनेक शिखरे सर केली आहे. एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहित शर्माने आपल्या 16 वर्षांतील अनुभवाबाबत मन की बात केली आहे.
भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माने आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलेय. त्याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके करणारा एकमेव खेळाडू आहे. तसेच टी20 मध्ये चार शतकांची नोंद आहे. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत दहा शर्माने 10 हजार धावांच्या जवळ पोहचला आहे. भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले. आपल्या क्रिकेट करिअरबद्दल रोहित शर्माने मन की बात केली आहे. रोहित शर्माने क्रिकेट करिअरमधील पाच महत्वाच्या घडामोडी शेअर केल्या आहेत. यामध्ये 2007 विश्वचषक विजय, कसोटी पदार्पणात शतक, ऑस्ट्रेलियातील गाबामध्ये कसोटी विजय, सीबी मालिकेत सचिन तेंडुलकरसोबत झालेली शतकी भागिदारी आणि श्रीलंकाविरोधात केलेली 264 धावांची खेळी... याचा समावेश आहे.
रोहित शर्माने आपल्या 16 वर्षांच्या पाच महत्वाच्या क्षणाबद्दल मन की बात केली. यामध्ये 2007 टी 20 विश्वचषक विजय यालाही स्थान दिलेय. त्याशिवाय कोलकाता येथे कसोटी पदार्पणात शतक झळकाल्याचा क्षण.. रोहित शर्माने कसोटी पदार्पणात वेस्ट इंडिजविरोधात 177 धावांची खेळी केली होती. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव, 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात सीबी मालिकेत सचिन तेंडुलकरसोबत केलेली शतकी भागिदारी आणि 2014 मध्ये श्रीलंकाविरोधात एकदिवसीय मालिकेत झळकावलेले द्विशतक याचा समावेश आहे. रोहित शर्माने श्रीलंकाविरोधात 173 चेंडूत 264 धावांची खेळी केली होती.
Rohit Sharma picks some of the best moments in his career:
— Johns. (@CricCrazyJohns) August 6, 2023
- 2007 World Cup win
- Debut Test hundred
- Gabba Test win
- Hundred run partnership with Sachin in CB series
- 264 runs in an ODI match. pic.twitter.com/qtWTCMsV0x
रोहित शर्माचे क्रिकेट करिअर -
रोहित शर्मा मागील 16 वर्षांपासून भारतीय संघासाठी क्रिकेट खेळत आहे. रोहित शर्माने 52 कसोटी सामन्यात 3677 धावांचा पाऊस पाडला आहे. 148 टी 20 सामन्यात त्याने 3853 धावा केल्या आहेत. तर 244 एकदिवसीय सामन्यात 9837 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे.