एक्स्प्लोर

IND vs NZ 3rd Test : हाताची घडी अन् मान खाली घालून... ऋषभ पंतवर भडकला रोहित शर्मा, ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे.

India vs New Zealand 3rd Test : न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट शांत राहिली आहे. हा सामना त्याच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असूनही हिटमॅनला मोठी खेळी खेळता आली नाही. भारताच्या पहिल्या डावात त्याला केवळ 18 धावा करता आल्या. या सामन्यात त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटण्याची संधी चाहत्यांना मिळाली नसली तरी हिटमॅनचे कर्णधारपद निश्चितच चांगले राहिले आहे.

त्याची रणनीती आणि घेतलेले निर्णय न्यूझीलंडच्या पहिल्या डावात योग्य ठरले. त्यामुळेच पाहुण्या संघाला पहिल्या डावात 235 धावांत रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित ऋषभ पंतवर रागाने ओरडताना दिसत आहे. मात्र, रोहितला कशाचा राग आहे हे कोणालाच माहीत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ कर्णधार रोहित शर्माचा ऋषभ पंतवर ओरडतानाचा ड्रेसिंग रूममधला आहे. रोहितला पंतचा इतका राग का आला हे माहीत नाही. रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडिओमध्ये एकीकडे रोहित पंतवर चिडत असताना दुसरीकडे पंत स्पष्टीकरण देताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये पंत हाताची घडी अन् मान खाली घालून दिसत आहे.

ऋषभ पंतने मुंबई कसोटीत बॅटने अप्रतिम कामगिरी केली हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याने 59 चेंडूंत 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, ज्यात आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. शुभमन गिलसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी 96 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने पहिल्या डावात 268 धावा केल्या आणि 33 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 9 गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी आहे. पण ही आघाडी खूपच कमी आहे.

दुसऱ्या दिवशी भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने 4 आणि आर अश्विनने 3 बळी घेतले. याशिवाय आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदरने 1-1 बळी घेतला. आता तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात किवी संघाला लवकर बाद केल्यानंतर टीम इंडियाला विजय मिळवायचा आहे.

हे ही वाचा -

R Ashwin Catch Video : शेर कभी बूढ़ा नहीं होता... वयाच्या 38 वर्षी 19 मीटर मागे धावत अश्विनने पकडा अद्भुत कॅच, रोहितची रिएक्शन व्हायरल

Sarfaraz Khan IND vs NZ : मुंबईचा 'हिरो' घरच्या मैदानावर ठरला 'झिरो'; टीम मॅनेजमेंटच्या चुकीमुळे सर्फराज खान शून्य आऊट?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Prajakta Mali :माफी मागणार नाही, चुकीचं बोललो नाही, प्राजक्ता माळीची मागणी फेटाळलीChhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषणJitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 04 July 2023

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Embed widget