एक्स्प्लोर

World Cup : हिटमॅन मोडणार अनेक विक्रम, विश्वचषकात रोहितच्या निशाण्यावर पाच रेकॉर्ड्स

Rohit Sharma ICC Cricket World Cup :  रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  नेतृत्वात भारतीय संघ (Team India) विश्वचषक विजयासाठी सज्ज झाला आहे.

Rohit Sharma ICC Cricket World Cup :  रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  नेतृत्वात भारतीय संघ (Team India) विश्वचषक विजयासाठी सज्ज झाला आहे. पाच ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला (Team India) विजयाचा दावेदार म्हटले जातेय. भारतीय संघाचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात (IND vs AUS) होणार आहे. विश्वचषकात ( World Cup ) रोहित शर्माची बॅट तळपेल. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये ( World Cup 2015) रोहित शर्माने खोऱ्याने धावा चोपल्या होत्या. रोहित शर्माने पाच शतकांची रीघ लावली होती. यंदाच्या विश्वचषकातही रोहित शर्मा अनेक विक्रमांना गवसणी घालेल. यामधील काही महत्वाच्या विक्रमाबद्दल जाणून घेऊयात....

सर्वाधिक षटकारांचा विक्रम - 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माच्या दृष्टीक्षेपात आहे. अवघे तीन षटकार मारताच रोहित शर्मा क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होईल. रोहित शर्माच्या नावावर सध्या 551 षटकारांची नोंद आहे. रोहित शर्माने 471 आंतरराष्ट्रीय डावात 551 षटकार मारले आहेत. सध्या षटकारांचा किंग युनिवर्स बॉस आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत. हा विक्रम रोहित शर्मा विश्वचषकात मोडेल, यात शंकाच नाही. 

वनडेमध्ये 300 षटकार 

वनडे क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा पल्ला गाठण्याची संधीही रोहित शर्माकडे आहे. रोहित शर्माला त्यासाठी फक्त आठ षटकारांची गरज आहे. वनडे क्रिकेटमध्ये 300 षटकार मारण्याची किमया फक्त दोन खेळाडूंना करता आली आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल याने वनडेमध्ये 351 षटकार ठोकले आहेत. तर पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने 331 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा हा विक्रम विश्वचषकात मोडू शकतो. 

18000 आंतरराष्ट्रीय धावा - 

विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 18 हजार धावांचा पल्ला पार करु शकतो. त्यासाठी रोहित शर्माला 358 धावांची गरज आहे. विश्वचषकात 9 साखळी सामने होणार आहेत, त्यादरम्यान रोहित हा विक्रम करु शकतो. भारताकडून याआधी सचिन तेंडुलकर,विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी 18 हजार धावांचा पल्ला पार केला आहे. 

वनडेमध्ये 950 चौकार

रोहित शर्माने 22 चौकार मारताच वनडे क्रिकेटमध्ये 950 चौकार ठोखणारा सहावा भारतीय खेळाडू ठरु शकतो. याआधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, वीरेंद्र सहवाग,सौरव गांगुली यांनी 950 चौकार ठोकले आहेत. 

वर्ल्ड कपमध्ये एक हजार धावा - 

रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 17 सामन्यात 978 धावा चोपल्या आहेत. आणखी 22 धावा काढताच रोहित शर्मा विश्वचषकात 1000 धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज होईल. याआधी सचिन, कोहली आणि गांगुली यांना हा पराक्रम केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Share Market Crash :ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा इफेक्ट, FPI कडून विक्री, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
Embed widget