Rohit Sharma Video Viral : रोहित शर्माला मिळाली RCBची ऑफर..., बंगळुरू कसोटीतील 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल
Rohit Sharma Join RCB Team IPL 2025 : आयपीएल सुरू होण्याच्या आधीपासून आयपीएल 2025 ची चर्चा आहे.
Rohit Sharma Video Viral Ind vs Nz 1st Test : न्यूझीलंड सध्या भारताच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांना 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, या कसोटी दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने आयपीएलबाबत एक मोठे अपडेटही शेअर केले होते. या कारणास्तव आयपीएल सुरू होण्याच्या आधीपासून आयपीएल 2025 ची चर्चा आहे. यंदाच्या आयपीएल हंगामा आधी मेगा लिलाव होणार आहे आणि म्हणूनच सर्व चाहते आणि क्रिकेट तज्ञ खूप उत्सुक आहेत. कारण मेगा लिलावानंतर प्रत्येक संघात बदल दिसत आहेत. यावेळी बीसीसीआयने काही नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्याची बरीच चर्चा पाहायला मिळत आहे.
रोहित शर्मा आयपीएल 2025 मध्ये आरसीबीकडे जाणार?
रोहित शर्माची गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. कारण त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहितनेच मुंबई इंडियन्सला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनवले. तथापि, आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये खरेदी करण्यात आले, त्यानंतर रोहित शर्माला संघाने कर्णधारपदावरून काढून टाकले,.
तेव्हापासून अशी अटकळ बांधली जात आहे की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडून आयपीएल 2025 मध्ये नवीन संघासोबत खेळू शकतो. आरसीबीचे चाहतेही त्याला आरसीबी संघात सामील होण्याची विनंती करत आहेत, आणि यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हायरल झालेला व्हिडिओ भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आहे. जेथे चिन्नास्वामी स्टेडियममधील एका प्रेक्षकांनी भारतीय कर्णधाराला पुढील हंगामात आयपीएलमध्ये कोणत्या संघासोबत खेळायचे आहे, असे विचारले. त्यावेळी साईट स्क्रीनवरून ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघालेल्या रोहित म्हणाला 'तुम्हाला कोणाला बघायचे आहे?' तेव्हा चाहत्याने उत्तर दिले, 'भाऊ, आरसीबीकडे या.' यावर रोहितही हसत निघून गेला.
Fan: "Which team in the IPL"
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2024
Rohit Sharma replied "Where do you want"
Fan: "Come to RCB"
Typical Rohit Sharma 😄👌 pic.twitter.com/A4XHZF8A3p
रोहितला विकत घेण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स आघाडीवर असल्याची अफवा होती. रोहित शर्माने लिलावासाठी स्वत:ला उपलब्ध करून दिल्यास हे दोन्ही संघ त्याला आपल्या कॅम्पमध्ये सामावून घेण्यास तयार आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने गेल्या महिन्यात स्टार स्पोर्ट्सवर बोलताना बंगळुरू फ्रँचायझीने रोहितला लिलावात विकत घेण्याची आणि त्याला कर्णधार म्हणून घोषित करण्याची विनंती केली तेव्हा आरसीबीबद्दल अटकळ सुरू झाली.
हे ही वाचा -