Rohit Sharma Fitness Test : रोहित शर्माने दिली फिटनेस टेस्ट; आता निकालही आला समोर, पास की नापास, वन-डे खेळणार की नाही?
Rohit Sharma Clears Fitness Test Update : टीम इंडियाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा बराच काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे.

Rohit Sharma Clears Fitness Test : टीम इंडियाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा बराच काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. हिटमॅनला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत अखेर रोहित शर्मा मैदानात उतरतानाचे चित्र स्पष्ट होते आहे. रोहितच्या फिटनेसवर (Rohit Sharma Fitness Test) कायम प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असले तरी त्याला आपल्या खेळाने व जिद्दीने उत्तर द्यायची कला त्याला चांगल्या प्रकारे येते. अलीकडेच त्याने ते करूनही दाखवले.
फिटनेस टेस्टमध्ये हिटमॅनचा जलवा
ऑस्ट्रेलियाविरुद्धची (India Tour Australia) मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली. रोहितही या टेस्टमध्ये सहभागी झाला आणि उत्तम गुणांसह ती उत्तीर्ण केला. यामुळे त्याच्या फिटनेसवर संशय घेणाऱ्यांचे तोंड बंद झाले.
🚨 GOOD NEWS FOR TEAM INDIA 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) September 1, 2025
Rohit Sharma looked very good during the fitness Test. [Rohit Juglan from RevSportz] pic.twitter.com/X1y3KG3qaC
अवघ्या 20 दिवसांत खेळ पलटला
फिटनेस टेस्ट पूर्ण करून मुंबईत परतल्यानंतर रोहितला पाहण्यासाठी विमानतळावर चाहत्यांची गर्दी उसळली होती. यावेळी तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत होता. काही आठवडे आधी जेव्हा तो कुटुंबासह सुट्टीवरून परतला होता, तेव्हा तो थोडासा जाड व पोट वाढलेला दिसत होता. पण अवघ्या 20 दिवसांत रोहितने मेहनतीने वजन कमी केले.
रोहित शर्मा झाला पास
खरंतर, जर रोहित शर्माने ही चाचणी (Rohit Sharma Clears Fitness Test) उत्तीर्ण केली नसती तर त्याला टीम इंडियाच्या संघात स्थान मिळाले नसते. बीसीसीआयने फिटनेस चाचणी खूप महत्त्वाची केली आहे. संघात स्थान मिळविण्यासाठी ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. रोहित शर्माने गेल्या काही दिवसांत अभिषेक नायरसोबत खूप सराव केला होता आणि त्याचे फायदे स्पष्टपणे दिसत आहेत.
हे ही वाचा -
The Hundred 2025 Final : नीता अंबानीच्या टीमवर पैशांचा पाऊस, सलग तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी





















