एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rohit Sharma : रोहित शर्माने मोडला मोठा विक्रम, सचिन-गांगुलीला मागे टाकले, पहिल्या स्थानावर विराजमान

Rohit sharma, World Cup : हिटमॅन रोहित शर्माने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Top 5 Batters With Most Six in World Cup : अफगाणिस्तानविरोधात रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली आहे. दिल्लीच्या मैदानावर रोहित शर्माच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. रोहित शर्माने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकले. रोहित शर्माच्या वादळी खेळीपुढे अफगाणिस्तानचे सर्वच गोलंदाज फिके ठरले. रोहित शर्माने आपल्या खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यापैकी एक विक्रम म्हणजे, रोहित शर्मा भारताकडून विश्वछषकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. याआधी रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर होता. हा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला पाच षटकारांची गरज होती. रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकातील दुसऱ्याच डावात हा विक्रम मोडीत काढला. 

विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याऱ्या पाच फलंदाजांबाबर जाणून घेऊयात.. 

5 . महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) :

2011 विश्वचषक फायनलमध्ये धोनीचा विजयी षटकार कुणीही विसरु शकत नाही. विश्वछचषकात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये एमएस धोनीचाही क्रमांक लागतो. या यादीज धोनी पाचव्या स्थानावर आहे. धोनीने भारतासाठी विश्वचषकाच्या 29 सामन्यात 15 षटकार मारले आहेत. त्याशिवाय धोनीने विश्वचषकात 780 धावा केल्या आहेत. 

4. वीरेंद्र सहवाग (Virender Shewag) :

भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सेहवाग पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करतो, त्यामुळेच तो या यादीमध्ये आहे. सेहवागने भारतासाठी 22 सामन्यात 18 षटकार ठोकले आहेत.तर विश्वचषकात त्याने 843 धावा केल्या आहेत. 

3. सौरव गांगुली (Sourav Ganguly) : 

विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने विश्वचषकात 21 सामन्यात  25 षटकार ठोकले आहेत. विश्वचषकात 55.88 च्या सरासरीने 1006 धावा चोपल्या आहेत. 

2. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) : 

गॉर्ड ऑफ क्रिकेट म्हणून ख्याती असणाऱ्या सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने 1992 ते 2011 यादरम्यान विश्वचषकात 45 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 27 षटकार ठोकले आहेत. सचिनचा हा विक्रम रोहित शर्मा यंदा मोडण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला यासाठी फक्त पाच षटकारांची गरज आहे.  

1. रोहित शर्मा (Rohit Sharma) :

चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या रोहित शर्माला क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ओळखले जाते. रोहित शर्माने आयसीसीच्या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माने दोन विश्वचषकात भारतासाठी 19 सामने खेळले आहेत. रोहितने विश्वचषकात 28 षटकार मारले आहेत.  

सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर - 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माने केला आहे. अफगाणिस्तानविरोधात तिसरा षटकार मारताच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 556 षटकारांची नोंद झाली आहे. रोहित शर्माने 473 आंतरराष्ट्रीय डावात 556 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने युनिवर्स बॉसचा विक्रम मोडीत काढला आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Embed widget