एक्स्प्लोर

नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी

तहसील पोलीस ठाणे हद्दीतील गांधीबाग परिसरात काली माता मंदिरासमोर रविवारी मध्यरात्री वैयक्तिक वादातून मामानेच सख्ख्या भाच्याला चाकूने हल्ला करून संपवल्याची घटना घडली.

Nagpur Murder Update: नागपूरच्या गांधीबाग परिसरात झालेल्या हत्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. काली माता मंदिराजवळ मध्यरात्री घडलेल्या या हत्याकांडात आता नवी माहिती समोर आली आहे. आपसी वादातून मामाने भाच्याचा खून केल्याचं उघडकीस आला असून काली माता मंदिरासमोर चाकूने जीवघेणा हल्ला करून भाच्याला संपत भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भाच्यालाही गंभीर जखमी केल्याची घटना घडलीय. जखमी तरुणावर मेईू रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करत असून घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Nagpur Murder)

तहसील पोलीस ठाणे हद्दीतील गांधीबाग परिसरात काली माता मंदिरासमोर रविवारी मध्यरात्री वैयक्तिक वादातून मामानेच सख्ख्या भाच्याला चाकूने हल्ला करून संपवल्याची घटना घडली. रवि राठोड असे मृत झालेल्या भाच्याचे नाव असून त्याला वाचवायला गेलेल्या भावाचे नाव दीपक राठोड असे आहे. बदनसिंग राठोड हे आरोपी मामाचे नाव आहे.(Crime News)

नक्की घडले काय?

नागपूरच्या गांधीबाग परिसरातील कालीमाता मंदिराजवळ मध्यरात्री सख्या मामाने भाच्याला चाकूने भोसकल्याची घटना घडली. घटना घडताना भावाला वाचवण्यासाठी गेलेला तरुण गंभीर जखमी झाला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला पैशांच्या जुन्या वादातून झाल्याचं कळतंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

वैयक्तिक वादातून खून

राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या, परळी गोळीबार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. नागपूर मध्ये घडलेल्या सलग दोन हत्याकांडांनी संपूर्ण शहर हादरलय. रविवारी दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमी परिसरात चौकीदाराला अज्ञात तरुणाने भोसकल्याची घटना उघडकीस आली.  त्यानंतर मध्यरात्री गांधीबाग परिसरात काली माता मंदिराजवळ मामानेच भाच्याला संपवल्याची घटना घडली. दोन्ही भाज्यांमध्ये आणि मामांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच हा खून झाल्याचं सांगण्यात येतंय.

दिवसाढवळ्या चाकूचे वार करत संपवले

नागपूर शहरातील हत्यासत्र थांबायचं नाव घेत नसल्याचं समोर येतंय. रविवारी दिवसाढवळ्या आणखी एकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दुपारी दोन वाजाताच्या सुमारास ख्रिश्चन स्मशानाच्या चौकीदारावर चाकूचे वार करत एका तरुणाने ही घटना जरीपटका ख्रिश्चन दफनभूमीत येथे घडली असून रमेश शेंडे असं खून झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. या घटनेने नागपूर शहरासह परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला ताब्यात घेतले असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.(Maharashtra Crime News)

हेही वाचा

दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget