एक्स्प्लोर

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

Beed Crime: दोषी नसताना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचं आणि जीवनातून उठवण्याचं काम सुरु आहे. ते होऊ नये, असे वक्तव्य ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केले आहे.

मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अशातच आता त्यांच्याच पक्षाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या एका वक्तव्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्य बाबत जी पक्षाची भूमिका राहील ती पक्षाची भूमिका जी अजित दादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य राहील, असे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले. ते सोमवारी नांदेडमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी खंडोबाच्या माळेगावचे दर्शन घेतले.  त्यानंतर माळेगाव यात्रेमध्ये त्यांनी फेरफटका मारला तसेच घोड्या व्यापाऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

वाल्मीक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येचे सूत्रधार असल्याचा आरोप विऱोधकांकडून केला जात आहे. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. वाल्मीक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही, असे सांगितले जाते. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या प्रचाराची आणि इतर गोष्टींची सूत्रे वाल्मीक कराड यांनीच पडद्यामागून हलवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वाल्मीक कराड यांच्यावर आरोप झाल्यापासून धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे हे मंत्री असल्यामुळे वाल्मीक कराड यांना राजकीय संरक्षण मिळते. वाल्मीक कराड यांच्या इशाऱ्यावर बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा काम करते. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन दूर केल्याशिवाय वाल्मीक कराड यांच्यावर कारवाई शक्य नाही, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या सततच्या आरोपांमुळे महायुती सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदावर टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते.

वाल्मीक कराड पोलिसांसमोर सरेंडर करणार?

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 21 दिवस उलटून गेल्यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये ठाण मांडून तपास करत आहेत. आतापर्यंत वाल्मीक कराड यांच्या अनेक निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांचे बँक खातेही गोठवण्यात आले आहे. सर्व बाजूंनी कोंडी झाल्यामुळे वाल्मीक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांना शरण जातील, अशी चर्चा आहे. वाल्मीक कराड हे सध्या महाराष्ट्रात की राज्याबाहेर आहेत, याबाबत माहिती नाही. त्यामुळे कराड आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सीआयडीला शरण जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी वाचा

वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar: महिला पोथ्या-पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे राहिले; मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या: रुपाली चाकणकर
महिला पोथ्या-पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे राहिले; मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या: रुपाली चाकणकर
Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Babanrao Taywade : मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप
मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
Embed widget