ICC : यंदाच्या आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी दोन इंग्लंडच्या तर एका न्यूझीलंडच्या खेळाडूला नामांकन
ICC POTM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने जून महिन्यातील प्लेयर ऑफ मंथच्या पुरस्कारासाठीची नामांकन जाहीर केली आहेत.
ICC Player of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या 'प्लेयर ऑफ मंथ'च्या पुरस्कारासाठी यंदाच्या महिन्यातील नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोसह जो रुट आणि न्यूझीलंडच्या डॅरी मिचेल यांची नाव जाहीर झाली आहेत. या सर्व फलंदाजांनी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात उल्लेखणीय कामगिरी केली.
कोणाची कामगिरी कशी?
यंदाच्या महिन्यात इंग्लंडच्या जॉनीने न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यात 78.80 च्या सरासरीने 394 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे त्याने 77 चेंडूत शतक ठोकत इंग्लंडसाठी एक रेकॉर्डही केला. त्याच्या 92 चेंडूतील 136 धावांमुळे संघाला मोठा फायदा झाला. त्याने 150 धावाही 144 चेंडूत करत एक दमदार खेळी केली. सर्वच सामन्यात त्याने अफलातून कामगिरी केली.
त्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधार जो रुटने 10 हजार कसोटी धावांचा टप्पा याच महिन्यात पूर्ण केला. त्याने मालिकेत 396 धावा केल्या. नाबाद 115 धावांची त्याची खेळी इंग्लंडसाठी अगदी मॅचविनिंग खेळी ठरली. मालिकाविजयात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.
न्यूझीलंडने मालिका गमावली, पण त्यांचा फलंदाज डॅरी मिचेलने अगदी जबरदस्त फलंदाजी केली. त्याने तब्बल 538 धावा ठोकल्याय यावेळी त्याने लॉर्ड्सवर एका सामन्यात 13 आणि 10 नंतर ट्रेन्ट ब्रिजवर 190 आणि नाबाद 62 तर हेंडिग्लेवर 106 आणि 56 धावांची खेळी केली.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड
आसीसीनं क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माईल, मरिझाने काप आणि इंग्लंडच्या नॅट स्किवर हीला नामांकित करण्यात आलं.
हे देखील वाचा-
- Rishabh Pant Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने केला खास रेकॉर्ड, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक
- Ind vs ENG, Day 4, Innings Highlights : भारताचा दुसरा डाव आटोपला, इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य
- ENG vs IND: 'भारतानं कितीही धावसंख्या उभारली, तरी आम्ही...' जॉनी बेअरस्टोनं सांगितला इंग्लंडचा पुढचा प्लॅन