ENG vs IND: पहिल्या टी-20 साठी भारतीय संघात मोठा बदल, व्हीव्हीएस लक्ष्मणकडं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जातोय. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडशी तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
![ENG vs IND: पहिल्या टी-20 साठी भारतीय संघात मोठा बदल, व्हीव्हीएस लक्ष्मणकडं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी A big change in the Indian team for the first T20, VVS Laxman will be the head coach ENG vs IND: पहिल्या टी-20 साठी भारतीय संघात मोठा बदल, व्हीव्हीएस लक्ष्मणकडं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/18/553ff7bdd28b7b4d0123f8eb20133cd6_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ENG vs IND: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जातोय. या निर्णायक कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडशी तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या सात जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यापूर्वीच पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणकडं (VVS Laxman) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपण्यात आलीय.
म्हणून लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षकपदी निवड
भारतीय संघाचे नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कसोटी संघाचा भाग आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामना 5 जुलैपर्यंत खेळला जाणार आहे आणि कसोटी संघाशी जुडलेले काही खेळाडू आणि स्टाफ पहिल्या टी-20 सामन्यासाठी उपलब्ध नसतील. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं पहिल्या टी-20 सामन्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.
आयर्लंड दौऱ्यावर लक्ष्मणनं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळली
यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं आयर्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय टी-20 संघानं 2-0 अशा फरकानं आयर्लंडचा पराभव केला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कोरोनातून सावरत असल्याची माहिती समोर आलीय. त्यानं टी-20 मालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचं समजत आहे.
विराट, जसप्रीत बुमराहला पहिल्या टी-20 मध्ये विश्रांती
पहिल्या टी-20 सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांना विश्रांती देण्यात आल्याचं बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं होतं.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)