ENG vs IND: 'भारतानं कितीही धावसंख्या उभारली, तरी आम्ही...' जॉनी बेअरस्टोनं सांगितला इंग्लंडचा पुढचा प्लॅन
भारत आणि इंग्लड यांच्यात एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारतानं दुसऱ्या डावात तीन विकेट्स गमावून 257 धावांची आघाडी घेतली.
India tour of England: भारत आणि इंग्लड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारतानं दुसऱ्या डावात तीन विकेट्स गमावून 257 धावांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे, आणखी दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. यामुळं हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाला कठीण लक्ष्याचा पाठलाग करावा लागण्याची शक्यता आहे. परंतु, हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघानं मास्टर प्लॅन बनवल्याचं जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) म्हटलंय.
इंग्लंडच्या पहिल्या डावात मोलाचा वाट उचलणारा जॉनी बेअरस्टोनं तिसऱ्या दिवशीच्या खेळानंतर म्हटलंय की, "भारताविरुद्ध कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडचा संघ शक्य ते प्रयत्न करेल. भारतानं कितीही धावा केल्या तरी आम्ही त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू", असंही त्यानं म्हटलंय.
जॉनी बेअरस्टोची चमकदार खेळी
इंग्लंडच्या पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोनं आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. इंग्लंडच्या संघानं त्यांच्या पहिल्या डावात 149 धावांवर सहा विकेट्स गमावले होते. त्यानंतर जॉनी बेअरस्टोनं 140 चेंडूत 106 धावांची खेळी करून इंग्लंडच्या संघानं सन्मानजनक आकड्यापर्यंत पोहचवलं. मात्र, त्यानंतर भारताला 134 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर फलंदाजी करण्यसाठी मैदानात आलेल्या भारतानं तिसऱ्या दिवसाअखेर तीन विकेट्स गमावून 257 धावांची आघाडी घेतलीय.
जॉनी बेअरस्टो इंग्लंडसाठी तारणहार ठरला
या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 416 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर संपुष्टात आला. जॉनी बेअरस्टोच्या शतकाशिवाय इंग्लंडला एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
हे देखील वाचा-