एक्स्प्लोर

Rishabh Pant Health: ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत दाखल, लिगामेंट सर्जरी होणार

Rishabh Pant Health: क्रिकेटर ऋषभ पंतचे पुढील उपचार मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात, थेट डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीत उपचार होणार आहेत.

Rishabh Pant Health: भारतीय टीमचा धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये पंत थोड्यात बचावला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार जळून खाक झाली... दिल्लीहून परतताना देहरादूनमधील हम्मदपूरजवळ हा अपघात झाला.कार चालवताना ऋषभला झोप लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर देहरादूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) उपचार सुरु होते. पुढील उपचारासाठी पंतला मुंबईला शिफ्ट करण्यात आले आहे. चार वाजण्याच्या आसपास ऋषभ पंत एअर अँबुलन्सने मुंबईत दाखल झाला.  क्रिकेटर ऋषभ पंतचे पुढील उपचार मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात, थेट डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीत उपचार होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. 

मुंबईतील रुग्णालयात ऋषभ पंत याच्यावर लिगामेंट सर्जरी होणार आहे. अपघातामुळे पंतला मोठ्या प्रमाणाच दुखापत झाली आहे. कार अपघातानंतर पंतच्या गुडघ्याला सतत सूज येत असून वेदनाही होत आहेत. त्यामुळे पंतचा एमआरआय करता आला नाही. दरम्यान, पंतला झालेल्या इतर जखमा भरल्या असून त्याची प्रकृतीही स्थिर आहेत. दरम्यान, ऋषभ पंतला यातून सावरण्यासाठी खूप मोठा कालवाधी लागणार आहे. पुढील काही दिवस ऋषभ पंत मैदानावर दिसण्याची शक्यता नाही. पण चाहते ऋषभ पंतसाठी प्रार्थना करत आहे. ऋषभ लवकर मैदानावर परतावा यासाठी क्रीडा चाहते प्रार्थना करत आहे

अपघातावेळी पंत गाडीत एकटाच -
अपघाताच्या वेळी ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता. अपघात झाल्यानंतर पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी पंतने कारची खिडकी तोडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. पण त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. 

तू लढवय्या - टीम इंडियाकडून पंतला धीर
ऋषभ पंतच्या अपघातानंतर भारतीय क्रिकेट टीमने त्याच्यासाठी एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात. 'तू लढवय्या आहेस, बरा हो आणि लवकर परत ये' अशा भावना खेळाडूंनी व्यक्त केल्यात ऋषभ पंतला लवकर बरं होण्यासाठी टीम इंडियाने शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, चहल, ईशान किशन, शुभमन गिल हे फायटर पंतला स्पीडी रिकव्हरीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rishabh Pant car Accident: ऋषभ पंतचा अपघात खड्ड्यामुळे? अपघातासंदर्भात एक मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget