Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंह अन् खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा; पण वडिलांच्या विधानानं सर्वांना धक्का
Rinku Singh and MP Priya Saroj: प्रिया सरोज यांच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना प्रिया सरोज आणि रिंकू सिंहच्या साखपुडाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.
Rinku Singh and MP Priya Saroj: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्फोटक फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) याचा सारखपूडा झाल्याची माहिती समोर आली होती. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (MP Priya Saroj) यांच्यासोबत रिंकू सिंहचा साखरपूडा (Rinku singh get engaged with mp priya saroj) झाल्याचं बोललं जात आहे. मात्र रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. याचदरम्यान प्रिया सरोज यांच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना प्रिया सरोज आणि रिंकू सिंहच्या साखपुडाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.
प्रिया सरोज आणि रिंकू सिंह यांच्यात सारखपुडा झाल्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाहीय, असं तुफानी सरोज यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या कुटुंबाने आमच्या मोठ्या जावयाशी, जे अलीगढमध्ये सीजेएम आहेत, रिंकू आणि प्रियाच्या नात्याबद्दल बोलले. पण साखरपुड्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे, असं तुफानी सरोज यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रिंकू सिंहचा सारखपुडा झाल्यानं चाहते आनंदी होते. मात्र तुफानी सरोज यांनी हे वृत्त फेटाळल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे.
प्रिया सरोज देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार-
प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असून सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केली. त्यानंतर, त्यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारण एंट्री केली आहे. गत 2024 मध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीपी सरोज ह्या दिग्गज राजकीय नेत्याचा पराभव करुन विजय मिळवला. वडिलानंतर आता त्यांची कन्या प्रिया सरोज येथील मतदारसंघातून लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. ज्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत. दरम्यान, प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज देखील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तुफानी सरोज 1999, 2004, 2009 मध्ये खासदार होते.
रिंकू सिंहची आंतरराष्ट्रीय कारकीर्द-
रिंकू सिंह प्रामुख्याने भारतासाठी टी-20 क्रिकेट खेळतो. दरम्यान रिंकूने एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. आतापर्यंत रिंकूने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2 एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रिंकूने एकदिवसीय सामन्याच्या 2 डावात 55 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या 38 धावा होती. याशिवाय, 22 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये, रिंकूने 46.09 च्या सरासरीने आणि 165.14 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा केल्या आहेत. रिंकून 3 अर्धशतक झळकावली आहे. ज्यात सर्वाधिक धावसंख्या 69* धावा आहे.
संबंधित बातमी:
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स