IND vs AUS : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी रवींद्र जाडेजा फिट, फिटनेस चाचणीत पास
IND vs AUS 1st test : रवींद्र जाडेजाने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. ज्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो भारतीय संघात सामील होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
IND vs AUS, 1st Test : रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो भारतीय संघात सामील होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, नॅशनल क्रिकेट अकादमीने बुधवारी (1 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांपूर्वी जाडेजाचा फिटनेस रिपोर्ट जारी केला, ज्यात त्याने फिटनेस टेस्ट पास केल्याने, त्याला नागपूरमध्ये उर्वरित संघात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
यापूर्वी रणजी करंडक स्पर्धेत उतरला होता मैदानात
जाडेजाने नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून एक सामना खेळला. तामिळनाडूविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात जडेजाने सुमारे 42 षटके टाकली, ज्यात त्याने 7 बळी घेतले. आता त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची फिटनेस चाचणीही उत्तीर्ण केली आहे. अशा स्थितीत तो बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
आशिया कपपासून टीम इंडियात नाही
जाडेजाने 2022 च्या आशिया कपमध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. स्पर्धेदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला पाच महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले. यानंतर तो 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळला गेलेला टी-20 विश्वचषकही खेळू शकला नाही.
दुखापतीवपूर्वी रवींद्र जाडेजाचा फॉर्म
दुखातग्रस्त होण्यापूर्वी रवींद्र जाडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्यानं यावर्षी 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. ज्यात 50.25 च्या सरासरीनं 201 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 141.54 इतका होता. तर, गोलंदाजीत जाडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याला फक्त 5 विकेट्स घेता आल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (India’s squad for first 2 Tests vs Australia) -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
महत्त्वाच्या इतर बातम्या :