एक्स्प्लोर
Jasprit Bumrah : मार्नस लॅबुशेनची 'ती' विकेट अन् जसप्रीत बुमराहने इतिहास रचला! 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घालत आहे.

Jasprit Bumrah breaks Bishan Bedi record
1/5

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घालत आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर बुमराहने आणखी एक विक्रम केला आहे. जसप्रीत बुमराह आता ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
2/5

या बाबतीत त्याने माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदीला मागे टाकले आहे. सिडनी कसोटीत मार्नस लॅबुशेनला बाद करताच बुमराहच्या नावावर ही मोठी कामगिरी नोंदवण्यात आली आहे.
3/5

जसप्रीत बुमराह आता ऑस्ट्रेलियातील कोणत्याही कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये बुमराहने 32 विकेट घेतल्या आहेत.
4/5

बुमराहने लॅबुशेनची विकेट घेताच इतिहास रचला. याआधी बुमराहने सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाची विकेट घेत असताना बिशन सिंग बेदीच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
5/5

बुमराहच्या आधी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम महान आणि दिवंगत फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदीच्या नावावर होता. 1977-78 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर त्यांनी संपूर्ण मालिकेत 31 विकेट घेतल्या होत्या.
Published at : 04 Jan 2025 07:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धुळे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
