Rahul Tewatia Marriage : ऑलराउंडर राहुल तेवतियाची पडली विकेट, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर
नुकताच भारताचा स्टार ऑलराऊंडर शार्दूल ठाकूरचा (Shardul Thakur) साखरपुडा पार पडल्यानंतर दुसरीकडे दुसरा ऑलराऊंडर राहुल तेवतियाही (Rahul Tewatia) लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
Rahul Tewatia Marriage : सध्या सर्वत्र लग्नाचा सीजन सुरु असताना भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूही मागे नाहीत. नुकताच शार्दूलने साखरपुडा केल्यानंतर आता राजस्थान रॉयल्सचा स्टार ऑलराउंडर राहुल तेवतिया (Rahul Tewatia) ही लग्नबंधनात अडकला आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. राहुल तेवतियाच्या पत्नीचं नाव रिद्धि पन्नू असं असून याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. ज्यानंतर आता जवळपास 9 महिन्यांनी त्यांनी लग्न केलं आहे.
राहुल आणि रिद्धि यांच्या लग्नाला अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. यामध्ये ऋषभ पंत, नीतीश राणा आणि युजवेंद्र चहल यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. राहुल हा मागील काही काळात आयपीएलमधून उदयाला आलेला युवा अष्टपैलू खेळाडू आहे. फिरकी गोलंदाजीसह फिनिशर फलंदाज म्हणून भूमिका निभावणारा राहुल राजस्थान रॉयल्स संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. राहुल विशेष म्हणजे आयपीएल, 2020 मध्ये पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात सलग 5 चेंडूत 5 षटकार ठोकून सर्वाधिक चर्चेत आला होता.
भारताकडूनही केलं पदार्पण
हरियाणाचा असणारा राहुल तेवतिया एक ऑलराउंडर क्रिकेटपटू आहे. तो फिरकी गोलंदाजीसह स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. 2013-14 मध्ये रणजी ट्रॉफीमधून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. अलीकडे सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही आंध्र प्रदेशविरुद्ध 25 चेंडूत 46 धावांची महत्त्वाची खेळी राहुलने केली. तसंच या वर्षाच्या सुरुवातीलाच इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत राहुलला भारतीय संघात स्थान मिळालं होतं. पण त्याला एकही सामना मात्र खेळता आला नाही. दरम्यान मागील काही सामन्यात खास कामगिरी न करु शकल्याने तेवतिया राजस्थान रॉयल्स संघाकडून यंदाच्या वर्षी खेळणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
हे ही वाचा-
- Ind vs NZ, Mumbai Test : न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी विराट संघात परतणार, कोणाला बाहेरचा रस्ता दाखवणार?, अशी असेल भारताची अंतिम 11
- वडील सचिन-द्रविडचे फॅन, लेकाचं नाव ठेवलं रचिन, भारताला विजयापासून रोखणाऱ्या रवींद्रचा भन्नाट प्रवास!
- शाब्बास रे पठ्ठ्यांनो, चांगली खेळपट्टी बनवलीत, राहुल द्रविडकडून ग्राऊंड स्टाफला 35 हजारांचं बक्षीस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha