(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prithvi Shaw : डूबते को तिनके का सहारा.... खराब फिटनेसमुळे बाहेर गेलेल्या पृथ्वी शॉची अचानक संघात निवड
भारताचा स्टार फलंदाज शॉ सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. अलीकडेच खराब फिटनेसमुळे त्याला मुंबईने रणजी ट्रॉफीच्या संघातून बाहेर केले होते.
Mumbai Squad for Syed Mushtaq Ali Trophy 2024 : भारताचा स्टार फलंदाज शॉ सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. अलीकडेच खराब फिटनेसमुळे त्याला मुंबईने रणजी ट्रॉफीच्या संघातून बाहेर केले होते. मात्र, आता शॉचे मुंबई संघात पुनरागमन झाले आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी त्याची निवड झाली आहे. निवड समितीने मेगा इव्हेंटसाठी 28 संभाव्य नावे जाहीर केली आहेत. पृथ्वी शॉ व्यतिरिक्त श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे हे देखील या संघात आहेत. शॉला आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले नाही, तर श्रेयस अय्यरला केकेआर आणि रहाणेला सीएसकेने सोडले आहे. आयपीएलच्या लिलावात या खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
शॉने या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून दोन सामने खेळले. पण या खेळाडूची कामगिरी दोन्ही सामन्यात खराब राहिली. पहिल्या सामन्यात त्याने 7 आणि 12 धावा केल्या, तर महाराष्ट्राविरुद्ध त्याने 1 आणि 39 धावांची खेळी केली. मात्र, इराणी ट्रॉफीमध्ये त्याने 4 आणि 76 धावा केल्या. भारतासाठी शॉने 5 कसोटी सामन्यात 42.37 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. तर या खेळाडूने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 189 धावा केल्या आहेत. 2020 मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. यानंतर त्याला कसोटी संघात संधी मिळाली नाही.
आयपीएल 2024 मध्येही शॉ मोठी कामगिरी करण्यापासून फेल ठरला. त्याला 8 सामने खेळण्याची संधी मिळाली. या कालावधीत सलामीच्या फलंदाजाने 24.75 च्या सरासरीने 198 धावा केल्या होत्या. गेल्या हंगामात शॉला केवळ 1 अर्धशतक झळकावता आले होते. खराब कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने त्याला आगामी हंगामासाठी सोडले.
Prithvi Shaw inculcated in Mumbai’s probables players list for Syed Mushtaq Ali Trophy 2024-25 #CricketTwitter #SyedMushtaqAliTrophy pic.twitter.com/rWXpLJKzCS
— Rajesh Khilare (@Cricrajeshpk) November 9, 2024
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई संघ
पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, जय बिस्ता, श्रीराज घरत, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सुर्यांश शेडगे, इशान मूलचंदानी, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), साईराज पाटील, आकाश पारकर, शाहरुख पारकर, हिमांशू सिंग, सागर छाब्रिया, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसोझा, रॉयस्टन डायस, योगेश पाटील, हर्ष तन्ना, इरफान उमैर, विनायक भोईर, कृतिक हनगावडी, शशांक अत्तर्डे, जुनेद खान.
हे ही वाचा -