Gautam Gambhir : मोठी बातमी! गौतम गंभीरची कोच पदावरून होणार हकालपट्टी? वनडे, टी-20साठी BCCIचा नवा प्लॅन तयार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-3 असा दारूण पराभव स्वीकारावा लागला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-3 असा दारूण पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ 24 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिकेत क्लीन स्वीप झाला. यापूर्वी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून दोन सामन्यांच्या मालिकेत 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे ते 22 नोव्हेंबरपासून यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत.
ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाची आहे. जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 4-0 ने जिंकली तर निश्चितच अंतिम फेरीत पोहोचेल. तथापि, हे करणे सोपे होणार नाही. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचीही ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर टेस्ट होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गंभीरने चार महिन्यांपूर्वी मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. आणि आधी भारतीय संघाने पहिल्याच श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिका गमावली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला. आता गौतम गंभीरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियात भारतीय संघाची कामगिरी खराब राहिल्यास गंभीरला कसोटी क्रिकेटमधील मुख्य कोचपदावरून हटवले जाऊ शकते. गंभीर सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आता पांढऱ्या चेंडूसाठी (ODI, T20) आणि लाल चेंडू क्रिकेट (कसोटी सामना) साठी स्वतंत्र प्रशिक्षक नियुक्त करण्याचा विचार करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या अनुभवी खेळाडूला मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, तर गौतम गंभीर पांढऱ्या चेंडूच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक राहू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल. (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
हे ही वाचा -